मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा टीका:जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी, प्रवीण दरेकरांचे खुले आव्हान

मराठा नेते मनोज जरांगे पाटील मराठा समजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. देवेंद्र फडणवीस यांच्या मुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले, असा आरोप देखील जरांगे लावत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस त्यांना रोखत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला होता. तसेच मराठे भाजपचा एन्काउंटर करणार असल्याचे देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, मनोज जरांगे कोणाचे एन्काउंटर करत आहेत? भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी महाविकास आघाडीचे एन्काउंटर करणार आहेत. आमचे मनोज जरांगे यांना खुले आव्हान आहे की त्यांनी निवडणूक लढवावी. सुपारी घेतल्यासारखे बोलू नये. जरांगे केवळ फडणवीस यांच्या द्वेषतून कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखे वारंवार बोलत आहेत. आता लोकांच्याही ते लक्षात आले आहे. पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नही हो सकता. अगदी तसेच देवेंद्र फडणवीस हे जरांगेमुळे परेशान होऊ शकतात पण ते पराजित नक्कीच होणार नाहीत. उलट विजयी होतील आणि मोठ्या फरकाने विजयी होतील हा आमचा विश्वास आहे. महाविकास आघाडीवर टीका करताना प्रवीण दरेकर म्हणाले, मला एवढेच सांगायचे की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे बरेच चेहरे आहेत आणि प्रत्येकाला आता डोहाळे लागलेले आहेत. यातूनच अनिल परब, उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मुख्यमंत्रीपद मिळेल असं विधान करतात, त्यातूनच मग जयंत पाटलांनी ही डोहाळे लागले आहेत, असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावला आहे.

Share

-