मोदींचा एक है तो सेफ हैचा नारा अदानींसाठी:राहुल गांधींची तिजोरी दाखवत पत्रकार परिषदेतून टीका

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप व केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, एका अरबपतीला श्रीमंत बनवण्याचा विचार यांचा आहे. मला असे वाटते की महाराष्ट्रातील जनतेला महागाईचा जास्त त्रास होत आहे. आम्ही महिलांना बससेवा मोफत करणार, महिलांना 3 हजार रुपये प्रतीमहिना देणार. मोफत एमएसपी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, आम्हाला वाटते की जातनिहाय जनगणना करावी, आरक्षणाची 50 टक्के मर्यादा वाढवण्याचा आमचा विचार आहे. याबद्दल आम्ही दिल्ली सरकारला देखील बोललो होतो राहुल गांधी म्हणाले, आरोग्य विमा देखील 25 लाखांपर्यंत आमची सरकार देणार, हे राजस्थानमध्ये चांगल्या पद्धतीने सुरू आहे. बेरोजगार युवकांना आम्ही 4 हजार रुपये प्रतिमहिना देणार. महत्त्वाचा मुद्दा आमचा हाच असणार आहे. एकीकडे धारावीची जमीन आहे, आदानी आहे, तर दुसरीकडे महागाई आहे. पुढे एक हे तो सेफ हे या घोषणेवर टीका करताना राहुल गांधी यांनी तिजोरी दाखवली. या तिजोरीमद्धूहण त्यांनी एक चित्र बाहेर काढले त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अडाणी यांचा फोटो दाखवला तसेच मुंबई येथील धारावीची जागा व त्याची ब्लुप्रिंट दर्शवली. त्यांच्या घोषणेचा अर्थ आम्ही तुम्हाला यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आले आहे. जवळपास 8 मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगार वाढत आहे. 5 लाख तरुणांचे रोजगार महाराष्ट्रातून हिरावून घेतले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या या सरकारने उद्योग चोरी करण्याचे काम केले आहे. अदानींनाच सर्व विमानतळ, धारावी दिली जात आहे. एवढेच नव्हे तर अदानींचा संपूर्ण महाराष्ट्राच्या जमिनीवर डोळा असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी म्हणाले, भाजपला महत्त्वाच्या मुद्द्यावरून भरकटवण्याची सवय आहे. म्हणून ते धर्मयुद्ध वगैरे असे विषय काढत आहे. महाराष्ट्रातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार यावर भाजप काही बोलू शकत नाही, म्हणून फक्त इतर विषय काढून लोकांचे लक्ष दुसरीकडे करण्याचे काम भाजप करत असते. आमची सरकार आली तर महाराष्ट्रातील जनतेच्या हिताची असणार आहे. त्यामुळेच आम्ही सगळे एकत्र उभे आहोत.

Share