नरेंद्र मोदी पंतप्रधान असूनही असुरक्षित वाटते:म्हणून भाजप बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा देते, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

मुंबई येथील बीकेसी मैदानात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. मुंबई ही स्वायत्त आहेच, महाराष्ट्राची राजधानी आहे. या मुंबईला तोडण्याची भाषा केली जात आहे. मात्र हे करू शकरणार नाहीत, करण मागेच शिवसेना प्रमुखांनी सांगून ठेवले आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार जरी केला तरी देहाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग आता हे दिल्लीच्या नीती आयोगाकडून मुंबईची ब्ल्यु प्रिंट बनवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आपले हिंदूत्व चूल पेटवणारे उद्धव ठाकरे म्हणाले, तिकडे पंतप्रधान मोदी असूनही जर यांना सुरक्षित वाटत नसेल तर मोदींनी राजीनामा द्यावा आणि शिवसेनेत घेणार नाही पण शिवसेना काम कसे करते ते बघायाल या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कटेंगे बटेंगेच्या घोषणेवर उद्धव ठाकरे यांनी भाजप महायुतीवर टीका केली. मी मुख्यमंत्री असताना असल्या घोषणा नव्हत्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपले हिंदूत्व चूल पेटवणारे आणि त्यांचे हिंदूत्व हे घर पेटवणारे असल्याची देखील टीका उद्धव ठाकरेंनी केली. मुंबई हे अदानीच्या घशात घालत आहेत संपूर्ण मुंबई हे अदानीच्या घशात घालत आहेत. फक्त मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आसपासचा परिसर देखील अदानीला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. केवळ धारावी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र या अदानीच्या घशात घालण्याचा हा घाट घातला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. माझे सरकार आल्यावर अदानीला देण्यात आलेले सर्व प्रकल्प मी काढून घेणार आहे. पंकजा मुंडे यांना धन्यवाद उद्धव ठाकरे म्हणाले, पंकजा मुंडे यांना धन्यवाद द्यायचे आहेत. पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली. भाजपचे काम साधेसुधे नसते असे त्यांनी सांगितले. 90 हजार बुथवर 90 हजार माणसे असल्याची माहिती त्यांनी दिली होती. हे सर्व लोक बाहेरचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर टीका उद्धव ठाकरे म्हणाले, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नरेंद्र मोदींनी भारतरत्न दिले. मला नवल वाटते त्यांचे, संरक्षणमंत्री असून हे असे बोलतात. राजनाथ सिंह मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, ठीक आहे तुम्ही म्हणला ते मानले तर गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात जे अल्पसंख्यांक आयोग नेमण्यात आला, त्यात एक सुद्धा बौद्ध समाजाची व्यक्ती का नाही, याचे उत्तर द्या. यांना आज त्या समाजाची लोक नको आहेत. तुम्ही फक्त सरकार बदला सोयाबीन आणि कापूसची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, मी तुम्हाला चांगला भाव मिळवून देईल, तुम्ही फक्त सरकार बदला, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन म्हणून आज पहिले मी नरेंद्र मोदींनी ट्विट केले आहे की नाही, केले आहे. करण राहुल गांधी यांनी देखील ट्विट केले आहे, नाहीतर तोंडावर पडले असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान उद्धव ठाकरे म्हणाले, मी काल ठाण्यात जाऊन या मिंधेला आव्हान देऊन आलो आहे. आज पुन्हा तुमच्या समोर मी त्यांना आव्हान देतो, जर हिम्मत असेल तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाऊन प्रचार कर. मी मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये टाकले. मला वाटलं किती चांगलं काम करत आहेत. पण त्या मागचा नीचपणा आज कळतोय. कारण राष्ट्रपुरुषाचा यादीत कोणत्याही व्यक्तीचे नाव आले तर त्याचे फोटो आणि नाव कोणीही वापरू शकतो म्हणून हे लुटारू गद्दार मिंधे माझ्या वडिलांचे नाव वापरत आहेत. आपल्या शिवसेनाप्रमुखांचे नाव वापरू शकतात. माझ्या वडिलांचे नाव शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव तुम्ही कपटकारस्थानासाठी शिवसेना संपवण्यासाठी म्हणजे दोन-तीन वर्ष आधीपासून यांचे प्लॅनिंग होते. मला अजूनही पत्रकार विचारतात खरी शिवसेना कोणाची मी म्हणतो खरी आणि पोटी शिवसेना असूच शकत नाही.

Share