नाशिकसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज:परतीचा मान्सून तूर्त नंदुरबार जिल्ह्यात खोळंबला

महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईची पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच काळी भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडू शकतात, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. राज्यात मान्सून परतीच्या मार्गावर असून तूर्त तो नंदुरबार जिल्ह्यात खोळंबला आहे. येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत तो पूर्णपणे परतण्याचा अंदाज आहे. दरम्यान आज नाशिकसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. केरळ किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्र अरबी समुद्राच्या मध्यावर पोहोचत आहे. समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवरून महाराष्ट्राच्या भूभागावर ताशी 28 तर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ताशी 37 किलोमीटर वेगाने पूर्वेकडूनही वारे वाहत आहेत. दोन्हीही समुद्रांतून होणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे 13 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी नाशिक शहरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. हवामान खात्यात 13 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईतील या भागात पाऊस मुंबईची पश्चिम उपनगरे अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, विलेपार्ले सांताक्रूझ, वांद्रे येथे सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. असाच मुसळधार पाऊस आणखी काही काळ सुरू राहिल्यास पश्चिम उपनगरातील सखल भाग जलमय होण्यास सुरुवात होईल. भिवंडी शहर व तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे भिवंडी शहर व तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहू लागले. काल सायंकाळपर्यंत पावसाने दमदार पुनरागमन केले असले तरी या पावसानेही नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिल्याचे दिसून येत आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी काल मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडल. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पश्चिम उपनगरे, कुर्ला येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवली. पावसामुळे सखल भागात पाणी साचू लागले होते. त्यात तात्पुरता बंद करण्यात आलेल्या अंधेरी सबवेमध्ये पाणी शिरले होते. राज्यातील इतरही बातम्या वाचा…. निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का:अमरावतीत अनेक नाराज नेत्यांचे राजीनामे; विश्वासात न घेता पदावरुन हटवण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर इतरही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा… महायुतीमधली धुसफूस चव्हाट्यावर:अजित पवार-एकनाथ शिंदेमध्ये वाद? अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीतून घेतला काढता पाय? विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुतीच्या नेत्यांमधील नाराजी आता उघडपणे समोर येत आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार हे दहा मिनिटातच निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातच वाद झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील नेत्यांमध्ये असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पूर्ण बातमी वाचा….

Share

-