नाशिक जिल्ह्यात 10 वर्षांत 12 मालमत्तांवर ‘वक्फ’ची मालकी:मालेगावमध्ये मात्र एकाही जागेवर नाही फेरफार नाद

शहरातील काठे गल्ली परिसरातील दर्ग्याच्या जागेवरील अतिक्रमण काढल्याने चर्चेत आलेल्या वक्फ बोर्डाच्या जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील तब्बल २१ मालमत्तांवर २०१५ नंतर विविध पत्रांद्वारे नोंदी घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यात १२ ठिकाणच्या क्षेत्रावर वक्फ बाेर्डांतगर्गत विविध मुस्लीम ट्रस्टला मालकी हक्क देण्यात आल्याचे समोर आले आहे.तब्बल २९.४१ हेक्टर आर आणि १४५३.४९५ चाैरस मीटर इतक्या या क्षेत्रांवर वक्फने दावा सांगितल्याचे आकड्यांतून स्पष्ट झाले आहे. त्यात सर्वाधिक नाशिक तालुक्यासह शहरातील ८ मालमत्तांचा समावेश असून तब्बल १०.२४ हेक्टर आर इतके हे क्षेत्र आहे. दरम्यान काठेगल्लीतील २५७.३६ चाैरस मीटर क्षेत्रापैकी ३७ चाैरस मीटरची नोंद मात्र प्रांतानी रद्द केली आहे. मालेगावमध्ये मात्र १० वर्षांत एकही फेरफार नोंद झालेली नाही. सन २०१५ पासून वक्फ बोर्डाला स्वायत्तता प्रदान करण्यात आली त्यानंतर त्यांनी विविध मालमत्तांच्या सातबारांवर नोंदींसाठी वेळोवेळी पत्र दिलेली आहेत. त्या पत्रांच्या आधारे तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी या नोंदी घेतल्या आहेत. त्याचे फेरफारही नोंदविले आहेत. केवळ पत्राच्या आधारे नोंद नाही केवळ वक्फच्या पत्राच्या आधारावर नोंद घेण्याचा प्रकार जिल्ह्यात कुठेही घडलेला नाही. वक्फची मालकी किंवा इतर अधिकारात वक्फ नियंत्रित सत्ता प्रकार असा फेरफार झालेला आहे. तो नियमानुसारच करण्यात आलेला आहे. – तुकाराम हुलावळे, उपजिल्हाधिकारी प्रशासन मालेगावी एकही नोंद नाही मालेगावमध्ये ज्या मालमत्ता वक्फच्या मालकीच्या होत्या त्यात गेल्या १० वर्षांत त्यात कुठलेही फेरफार झालेले नाही. त्याबराेबरच खासगी व्यक्तींच्या नावाने कुठल्याही मालमत्तांवर नोंद घेतलेली नाही. – विशाल सोनवणे, तहसीलदार, मालेगाव शासन आदेशाचे पालन हाेत नाही महसूल विभागाकडे वक्फ बोर्डाद्वारे पत्र दिले तरीही ते नो‌ंदी घेत नाहीत. जेथे घेतल्या त्या जागा लोकांनी दान, बक्षीस दिल्या. वक्फ बोर्ड केंद्राच्या नियमाने स्थापित झाले. राज्य शासनानेही त्यांच्या आदेशाचे पालन करण्याची सूचना काढली. पण पालन हाेत नाही. – दिलावरखान पठाण, अध्यक्ष, वक्फ मिळकत बचाव फाउंडेशन या १० ठिकाणी मात्र नोंदी अद्याप प्रलंबित १) पिंपळगाव बहुला : २१० /अ / प्लॉट/१ २८५.०० चाैरस मीटर अद्याप कार्यवाही प्रलंबित
२) म्हसरुळ : २२३ ०.०३५० चाैरस मीटर तलाठ्यांनी तहसीलदारांकडून सल्ला मिळावा, यासाठी पत्र दिले.
३) म्हसरुळ : जुना सर्वे नंबर २५० : नावीन सर्वे नंबर २५०/१ ते ५ सर्व ५ गटनंबर मिळून वक्फने नाव दाखल करण्यासाठी पत्र दिले. ८.९९ हे.आर सध्या मनपाच्या नावे तलाठी यांनी तहसीलदारांकडे मार्गदर्शन मागविले आहे.
४) पिंप्री सय्यद : ५ ०.३७ आर छत्रपती संभाजी नगर येथे वक्फ बोर्डांकडे नाव लावण्यासंदरर्भात दावा सुरू
५) इगतपुरी : ७८४/ क ६७३.१ चौ.मी. २०१९ पासून कुळकायदा शाखेकडे सय्यद साहब दर्गासाठी सरकारी पडित जमीन देण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.
६) निफाड (चितेगांव) : १३ ०.५ हे.आर. वक्फ सत्ता प्रकार नोंदीसाठी कार्यवाही प्रलंबित
७) पिंपळगाव (बसवंत) : स.नं.५०२ ६.५१ हे. आर. वक्फ सत्ता प्रकार नोंदीसाठी कार्यवाही प्रलंबित
८) सिन्नर (वडांगळी) : १८५ २० आर कार्यवाही प्रलंबित.
९) येवला (पाटोदा) : २२९ व १७८/२ १ हे.५३आर इतर अधिकारात वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकारासाठी नोंद प्रलंबित
१०) नांदगाव(मनमाड) : १८६/१/२/६/ १२२ चौ.मी. व ११६ चौ.मी वक्फी मालकीसाठी नोंद घेण्यासाठी कार्यवाही झालेली नाही. प्लॉट नं.५५ व ५६ या १२ जमिनींच्या मालकी हक्कांच्या नोंदी १) नाशिक : गट नंबर ४८०/३अ /३ ब/६ पैकी २५७.३६ चाैरस मीटर( काठे गल्लीत कारवाईनंतर नोंद रद्द)
२) आनंदवल्ली : ६५ /२, १७ आर इतर अधिकारात. ३) पाथर्डी : १ ५८/१ ०.१५ आर हे. फेब्रुवारी २०१५ रोजी मुसलमान कब्रस्तानची नावाची नोंद.
४) आनंदवल्ली : ६५/२ ०.१७ आर.हे. हजरत पीर सय्यद राजशा दर्गा जहागीर मस्जिद वक्फ बोर्डचे ७-१२ सदरी २०२२ रोजी नाव दाखल
५) त्र्यंबक : १६० ०.६३ हे.आर इतर अधिकारात नोंद
६) हरसूल : ११७ ५.४३ हे. आर. इतर अधिकारात नोंद
७) दिंडोरी : ७८५ २ हे.७४ आर ०५/०८/२०१७ अन्वये दावलशा पीर दर्गाह, कब्रस्तान वक्फ संस्था दिंडोरी नाेेंद.
८) पेठ : २३२०.६९ हे.आर. वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार नावाची इतर अधिकारात नोंद.
९) पांगरी बुद्रुक : २२३ खाते क्रमांक ५०४२ २० आर भोगवटा सदरी कादरीया जामा मशीद कब्रस्तान, ईदगाह नोंद.
१०) चांदवड (दुगाव) : ७५२ ०.२० हे.आर. २०२२ रोजी सुन्नी मस्जिद आणि कब्रस्तान मुस्लिम पंच कब्रस्तान दुगाव नोंद.
११) चांदवड (दुगाव) : ४४७ ०.५१ हे.आर. २०२२ रोजी सुन्नी मस्जिद आणि कब्रस्तान मुस्लिम पंच दुगाव म्हणून इतर अधिकारात नोंद.
१२) देवळा : ५५० ०.४२ हे. आर. नोंद नं.१३१३९ ही १० एप्रिल २०१७ रोजी घेण्यात आली आहे.

Share