राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रमामध्ये बालकांची तपासणी करा:डॉ. सुवर्णा भापकर

प्रतिनिधी | तिसगाव राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रमाअंतर्गत किशोरवयीन मुला-मुलींची नियमित तपासणी करून घेतल्यास या वयातील विद्यार्थ्यांना पुढील काळात होणाऱ्या मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळू शकते, असे मत डॉ. सुवर्णा भापकर यांनी व्यक्त केले. श्री तिलोक जैन विद्यालयात आयोजित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी गटशिक्षणाधिकारी अनिल भवर, डॉ. मनीषा खेडकर, प्राचार्य अशोक दौंड, डॉ. नितीन शिंदे, डॉ. प्रीती मगर, डॉ. सागर भापकर आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. भापकर म्हणाल्या, की राष्ट्रीय स्वास्थ्य बाल कार्यक्रमात शून्य ते १८ वयोगटातील बालक व किशोरवयीन मुलांमुलींची नियमित तपासणी केली जाते. या तपासणीत जन्मजात विकृती, जीवनसत्वाच्या कमरतेमुळे निर्माण होणारे आजार आढळून आल्यास त्यावर उपचार केले जातात, तर बालकाच्या विकृतीचे योग्य निदान करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषोधोपचार केले जातात.

Share