राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर:मात्र, या बड्या मुस्लिम नेत्याचे नाव नसल्याचे शरद पवार गटाची टीका

अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांची नावे यादीत आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे नाव या यादीत नाही. नवाब मलिक यांच्यावर ईडीचा खटला सुरू आहे. त्यांच्या नावावर भाजपचा देखील आक्षेप आहे. यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी टोला देखील मारला आहे. ट्विटरवर स्टार प्रचारकांची यादी जाहीर करताना अजित पवार यांनी लिहिले की, “महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ वाहणार, राष्ट्रवादीचे घड्याळ जोमाने फिरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाचा राष्ट्रवादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये या नेत्यांचा समावेश अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, अदिती तटकरे, नितीन पाटील, सयाजीराव शिंदे, अमोल मिटकरी, जल्लाउद्दीन सय्यद, धीरज शर्मा, रुपाली इंद्रिया, सुप्रसिद्ध नाईक, सुप्रसिद्ध पाटील, कृष्णा चव्हाण आदी नेत्यांची यात नावे आहेत. तर कल्याण आखाडे, सुनील मगरे, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, उदयकुमार आहेर, शशिकांत तरंगे, वसीम बनहान, प्रशांत कदम, संध्या सोनवणे यांच्या नावांचाही यात समावेश आहे. नवाब मलिक यांचे नाव नाही या स्टार प्रचारकांच्या यादीत नवाब मलिक यांचे नाव नाही. या मुद्द्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांना घेरले आहे. नवाब मलिक हे यापूर्वी शरद पवार गट राष्ट्रवादीत होते. गेल्या वर्षीच ते अजित पवार गटात सामील झाले. शरद पवार गटात असताना नवाब मलिक अनेकदा भाजपवर हल्लाबोल करायचे. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. आता अजित पवार गटात सामील झाल्यानंतर पक्षाने त्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीतही समावेश केला नसल्याने शरद पवार गटाने टीका केली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ हिट अँड रन प्रकरण:मर्सिडीजच्या धडकेत 21 वर्षीय मुलाचा मृत्यू, आरोपी फरार; 6 महिन्यातील चौथी घटना ठाण्यात एका 21 वर्षीय मुलाला मर्सिडीज कारने धडक दिली, त्यात त्याचा मृत्यू झाला. दर्शन हेगडे असे मृताचे नाव आहे. 20 ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. दर्शन खाद्य पदार्थांची खरेदी करून घरी परतत असताना हा अपघात झाला. नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या मर्सिडीजने त्याला धडक दिली अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. पूर्ण बातमी वाचा… निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी शिवसेनेच्या खटल्याचे वकील व्हावे:यमाई देवी कृपेच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे गटाने घेरले ​​​​​​​यमाई देवीच्या कृपेने सन्माननीय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले. देवीच्या कृपेने व श्रद्धेने त्यांनी न्यायदान केले, पण हे न्यायदान सत्य व प्रामाणिकपणास ठोकरणारे का ठरले? महाराष्ट्रात एका घटनाबाह्य, बेकायदेशीर, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेल्या सरकारला अभय देऊन चालवण्याचे काम कोणाच्या प्रेरणेने झाले? शिवसेना हे नाव, धनुष्यबाणासारखे चिन्ह हीसुद्धा महाराष्ट्रीय जनतेची श्रद्धा होतीच. संविधानाच्या दहाव्या शेड्यूलचा मान राखून न्यायदान करा, असा साक्षात्कार सरन्यायाधीशांना देवीने दिला नाही की देवीच्या श्रद्धेवर तेराव्या अवताराचे आदेश भारी पडले? यमाई देवी सरन्यायाधीशांना कौल देत असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा खटला आम्ही यमाई देवीच्या देवळात चालवायला तयार आहोत. निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी या खटल्याचे वकील व्हावे. बोला, आहे तयारी? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाने सामनाच्या माध्यमातून सरन्यायाधीशांवर टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share