नवनीत राणा पुन्हा लोकसभेत जाणार?:भाजपने नांदेड पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. नवनीत राणा या नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. नवनीत राणा यांना भाजपने नांदेड लोकसभेची उमेदवारी द्याची, अशी मागणी भाजपच्या एका गटाकडून करण्यात आल्याची माहिती आहे. कारण नांदेड येथे शीख धर्मियांचे तीर्थस्थळ आहे, तर नवनीत राणा यांचे वडील मूळ पंजाबचे आहेत, त्यामुळे त्या तिथे जिंकतील, असे या गटाचे म्हणणे आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा यांचा पराभव झाला होता. काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपने नवनीत राणा यांना नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार द्यावी अशी मागणी होत आहे. भाजपच्या एका गटाकडून ही मागणी करण्यात आली. आता या मागणीवर भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे पहावे लागणार आहे. काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी नांदेड लोकसभेचे खासदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीत वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांनाच उमेदवारी देण्याचा ठराव पारीत करण्यात आला होता. भाजप कुणाला संधी देणार? भाजपने या पोटनिवडणुकीसाठी अद्याप आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे भाजप या ठिकाणी पुन्हा प्रतापराव चिखलीकर यांनाच संधी देते, की त्यांच्या जागी एखादा नवा चेहरा मैदानात उतरवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच भाजपच्या एका गटाने नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. आता या मागणीवर भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, नवनीत राणा यांचे पोटनिवडणुकीत पुनवर्सन करतील का? हे पहावे लागणार आहे. MIM चे इम्तियाज जलील निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे त्यांचा सामना काँग्रेसचे येथील उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने अद्याप येथून उमेदवार दिला नाही. दरम्यान, जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथून विधानसभा निवडणूक लढवण्याचेही संकेत दिलेत. वसंतराव चव्हाणांनी केला होता चिखलीकरांचा पराभव कॉंग्रेसचे दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत नांदेड लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले. मात्र खासदार वसंतराव चव्हाण यांचे अवघ्या तीन महिन्यातच निधन झाले. त्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणूक लढवली जाणार आहे.

Share