नव्या शैक्षणिक वर्षात अकरावीचे प्रवेश केंद्रिय पद्धतीने होणार:जिल्ह्यातील 495 महाविद्यालयातील अतिरिक्त प्रवेशांना आळा

नव्या शैक्षणिक वर्षात २०२५-२०२६ पासून सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय म्हणजेच ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहिर करण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणीच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थाचालकांच्या विरोधामुळे ऑनलाइन ऐवजी पारंपारिक पद्धतीनेच प्रवेश होते. आता मात्र प्रवेशातील पारदर्शता आणि अतिरिक्त प्रवेशाला लगाम बसवण्यासाठी सर्वच ठिकाणी ऑनलाइन प्रवेश दिले जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेवर शिक्षण आयुक्त नियंत्रण ठेवणार असून, त्याची अंमलबजावणी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. अकरावीत नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा. असा अट्टाहास प्रत्येक विद्यार्थी पालकांमध्ये असतो. परंतु सर्वांनाच नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळतोच असे नाही. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया, तेथील मिरिटनुसार प्रवेश दिला जातो. यामुळे इच्छा असूनही अनेकांना हवे ते महाविद्यालय मिळत नाही. तर शहरी भागातील महाविद्यालये सोडून खासगी शिकवणीसाठी अनेक जण ग्रामीण भागात प्रवेश घेत असल्याचेही चित्र काही वर्षात दिसू येत आहे. या सर्व प्रकारांना लगाम लावण्यासह आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क, प्रवेश प्रक्रिया यात पारदर्शकता असावी. यासाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. सर्वांना त्यांचे शुल्क जाहिर करावे लागणार
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ही पारदर्शकतेसाठी आवश्यक असून, शासनाची तशी भूमिका आहे. यामुळे अतिरिक्त प्रवेशांना आळा बसेल. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेता येतील, अशी माहिती शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी दिली. संस्थाचालकांनी केला हाेता विरोध छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०१6 व 20१७ या दोन्ही शैक्षणिक वर्षात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात आली होती. परंतु प्रवेश होत नाही. जिल्ह्यात प्रवेश क्षमता जास्त आहे. त्यासाठी ऑनलाइनची गरज काय? या नावाखाली संस्थाचालकांनी विरोध केला होता. त्यामुळे जिल्हयातील ऑनलाइन प्रवेश नंतर रद्द करण्यात आले होते. आता मात्र नव्या शैक्षणिक सत्रात सर्वांनाच प्रवेश ऑनलाइन करावे लागणार आहे. अशी आहे जिल्हयातील आकडेवारी –
एकूण महाविद्यालय ४९५
कला शाखा – १०,४५६
विज्ञान शाखा – ६२००
वाणिज्य शाखा – २५६०
संयुक्त शाखा – ४९५

Share