नवा डाव:शरद पवार गटाची पहिली यादी; 45 पैकी 10 उमेदवार आयात, अहेरीत होईल बाप-लेक लढत

राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभेसाठी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात १० उमेदवार इतर पक्षांतून आयात केलेले आहेत. यात प्रामुख्याने हर्षवर्धन पाटील – इंदापूर, सुधाकर भालेराव – उदगीर, संदीप नाईक – नवी मुंबई, डाॅ. राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराजा, भाग्यश्री अत्राम – अहेरी, समरजितसिंह घाटगे – कागल, प्रताप ढाकणे – शेवगाव, चरण वाघमारे – तुमसर, बापूसाहेब पठारे – वडगाव शेरी यांचा समावेश आहे.
शरद पवारांचे नातू रोहित पवार गेल्यावेळी कर्जत-जामखेडमधून लढले होते. यंदा दुसरे नातू युगेंद्र पवारांना बारामतीमधून संधी मिळाली आहे. ते सख्खे काका अजित पवारांविरुद्ध लढतील. अहेरीमध्ये शरद पवारांनी अजित पवार गटाचे मंत्री धर्मराजबाबा अत्राम यांच्याविरुद्ध त्यांची मुलगी भाग्यश्रीला उमेदवारी देऊन बाप-लेकीची लढत निश्चित केली आहे. पहिल्या यादीत किमान चारजण मुस्लिम उमेदवार असतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात फक्त महेबूब शेख या एकमेव कार्यकर्त्याला आष्टीतून तिकीट मिळाले आहे.

Share

-