निष्ठावंतांना डावलून उद्धवसेनेत भाजपतून आयातांना उमेदवारी:संभाजीनगरात 5 पैकी 4 मतदारसंघात हीच रणनीती, स्थानिकांमध्ये नाराजी‎

‘गद्दार विरुद्ध खुद्दार’ आणि ‘पचास‎खोके सब ओके’ असा आक्रमक‎प्रचार करणाऱ्या उद्धवसेनेने‎विधानसभा निवडणुकीत भाजपतून‎आयात शिवसैनिकांना उमेदवारी‎देण्याची रणनीती आखल्याने‎निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे.‎उद्धवसेना संभाजीनगरातील ९ पैकी ६‎जागा लढवणार आहे. त्या पाचही‎जागांवर निष्ठावंतांना डावलून‎भाजपतील आयातांना उमेदवारी‎दिली जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे‎कठीण‎ काळातही सामान्य कार्यकर्ते‎कुठे कमी पडले नाही. संकटाच्या‎काळातही पक्षाशी एकनिष्ठ‎राहणाऱ्यांना अशीच फळे मिळणार‎ का, असा प्रश्न मूळ शिवसैनिक ‎विचारत आहेत.‎ पश्चिम विधानसभा : मतदारसंघात‎बन्सीधर गांगवे ३० वर्षांपासून, तर चेतन‎कांबळे हे २४ वर्षांपासून निष्ठावान कार्यकर्ते‎आहेत. त्यांचा दावा असताना भाजपतून‎आलेले राजू शिंदे यांच्या नावाची शक्यता‎आहे.‎ वैजापूर : शिंदेसेनेत गेलेल्या रमेश बोरनारेंना‎पाडण्यासाठी उद्धवसेना माजी नगराध्यक्ष दिनेशसिंह‎परदेशींना रिंगणात उतरवणार आहे. तेथेही उद्धवसेनेचे‎निष्ठावंत अविनाश गलांडे, संजय निकम, प्रकाश चव्हाण‎यांच्या कार्यकर्त्यांमधून अन्यायी भावना व्यक्त होत आहे.‎ ‎यापुढे पक्षाचे काम कसे करावे?‎ ‎रात्रंदिवस पक्षासाठी काम केले. माझ्यासारखे अनेक‎‎निष्ठावंत आहेत. त्यांना उमेदवारी हवी होती. शिंदे गटाच्या‎‎बंडाळीमुळे आमच्या कामाचे चीज होईल, असे‎‎आम्हाला वाटत होते. पण आता उमेदवारी मिळण्याची‎शक्यता धुसर झाली आहे. -चेतन कांबळे, प्रदेश संघटक, शिवसेना‎ सिल्लोड : येथील सत्तारगडाला हादरा देण्यासाठी‎भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश बनकर यांच्या उमेदवारीची‎केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. तेथे निष्ठावंत‎विठ्ठल बदर यांच्यासह अनेकांमध्ये अस्वस्थता आहे.‎उमेदवारीसाठी इच्छुकांनाही मोठी आशा आहे.‎ मध्य : येथे पक्षाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांना संधी देण्याची चर्चा सुरू‎आहे. तेदेखील काही काळ भाजपच्या मांडवाखालून जाऊन आले आहेत. असे असताना‎बाळासाहेब थोरात, नंदकुमार घोडेले या उद्धवसेनेसोबत राहिलेल्यांमध्ये डावलण्यात‎आल्याची भावना आहे. थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास‎दानवे यांच्याकडे जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.‎ पैठण : खासदार पुत्र विलास भुमरे‎यांच्याविरोधात दत्ता गोर्डे, मनोज पेरे यांनी ‎संघटनात्मक कामे केली, मात्र तेथे माजी‎ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे‎निकटवर्तीय सचिन घायाळ यांना उमेदवारी‎ दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.‎ ‎निवडून येणे हाच निकष‎ ‎राज्यातील परिस्थितीत उद्धव साहेबांच्या उमेदवारांचा स्ट्राईक रेट‎‎वाढवणे हा एकमेव निकष यामागे आहे. सिल्लोड भाजपचा‎‎मतदार संघ असल्याने तुल्यबळ उमेदवार आमच्याकडे नव्हता.‎‎राजू शिंदेंचे नाव सर्व्हेमधून पुढे आले. वैजापूरचे सर्व शिवसैनिक‎परदेशींच्या मागे आहेत. त्यामुळे निष्ठावंतांना नाकारून आयातांवर मर्जी‎दाखवण्याचा प्रकार नाही. – किशनचंद तनवानी, जिल्हाप्रमुख, उबाठा‎

Share

-