फक्त BJPच मृत्यूनंतर बदनामी करू शकते:​​​​​​​दाल मे कुछ काला है; बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्याच्या PC वर नाना पटोले यांचा संताप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांनी घेतलेल्या संक्षिप्त पत्रकार परिषदेच्या मुद्यावरून सरकारवर विशेषतः भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणी त्यांनी भाजपवर बाबा सिद्दीकी यांची मृत्यूनंतरही बदनामी करण्याचा आरोप करत असे हीन कृत्य केवळ भाजपच करू शकते, अशी टीका केली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई टोळीने ही हत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणी योगेश कुमार नामक आरोपीला नुकतीच उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. हा आरोपी कोठडीत असताना त्याने चक्क पत्रकारांशी संवाद साधला. त्याचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्यात तो बाबा सिद्दीकी यांचा संबंध थेट अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी जोडताना दिसून येत आहे. दाल मे कुछ काला है काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत भाजपवर मृत्यू झालेल्या व्यक्तीची बदनामी चालवण्याचा आरोप केला आहे. मृत्यूनंतरही बदनामी करायची, हे हीन कृत्य फक्त भाजपाच करू शकते. नाहीतर एका खुन्याला पत्रकार परिषद कशी घेऊ दिली जाते? दाल मे कुछ काला है, असे नाना पटोले आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आरोपी योगेश कुमारचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. आता पाहू आरोपी व्हिडिओत काय म्हणतो? सदर व्हिडिओत आरोपी म्हणतो की, बाबा सिद्दीकी हे काही चांगले व्यक्ती नव्हते. त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सामान्य माणसांवर असा गुन्हा दाखल होती नाही. त्यांचे दाऊद इब्राहिमशीही संबंध होते असेही सांगितले जाते. यावेळी पत्रकारांनी त्याला एखाद्याला व्यक्तीला लक्ष्य करायचे असेल तर त्याची माहिती कुठून मिळते? असा प्रश्न केला असता तो म्हणाला, आजकाल मोबाईलमधून कोणतीही माहिती मिळते. गुगल, इंटरनेट यावरून आपल्याला हवी ती माहिती प्राप्त होते. अनेक शूटर यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून पिस्तुल चालवणे शिकतात. पत्रकारांनी यावेळी त्याला बिश्नोई टोळीचे पुढील लक्ष्य कोणते? असा प्रश्न केला. त्यावर बोलताना आरोपी योगेश कुमार म्हणाला की, मी तर आता तुरुंगात जात आहे. त्यामुळे मला त्याची कल्पना नाही. पण बिश्नोई टोळी खूप मोठी आहे. 100 हून अधिक जण या टोळीत कार्यरत आहेत. देशाबाहेरही आमचे काही सहकारी आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडाप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यासंबंधी शुक्रवारी आणखी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या पाच जणांनी हल्लेखोरांना परदेशी बनावटीचे शस्त्र पुरवले होते. तसेच त्यांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्थाही केली होती. हे ही वाचा… महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?:भाजपला सर्वाधिक 155, शिवसेना 78, राष्ट्रवादी काँग्रेसला 55 जागा मिळणार असल्याचा दावा मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप सर्वाधिक 155 जागांवर लढणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 78 तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 55 जागा सोडण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर लाडकी बहीण योजनेचा पैसा सरकारने थांबवला:नवे अर्ज स्विकारणेही झाले बंद, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सरकारने घेतला निर्णय मुंबई – निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला आहे. तसेच नवे अर्ज स्विकारणेही बंद केले आहे. यामुळे महायुती सरकारच्या या महत्त्वकांक्षी योजनेला तूर्त ब्रेक लागला आहे. वाचा सविस्तर

Share

-