पाक रेल्वे अपहरण:ते दृश्य प्रलयासारखे वाटले, डोळ्यांसमोर भावाला मारले, प्रवाशांची आपबीती
बलूचिस्तान प्रांतातील जाफर एक्सप्रेस रेल्वे अपहरणात अडकलेल्या प्रवाशांनी परतल्यावर सांगितलेली आपबीती अंगावर काटा आणणारी आहे. नूर मोहम्मद यांच्या पत्नीने त्या भयानक क्षणांची आठवण करताना सांगितले की, माझे हृदयाची धडधड वाढली होती. खूप घाबरल्याने घाम येत होता. माझ्या समोर दोन लोक बेशुद्ध झाले. शस्त्रधारी लढवय्ये दरवाजा तोडून आत घुसले आणि बाहेर जा नाहीतर गोळी मारू, असा इशारा दिला. मोहम्मद यांच्या पत्नीने सांगितले की, मागे वळून न पाहण्याची धमकी दिली. सैन्यात काम केलेले अल्लाहदित्ता कसेबसे क्वेटाला पोहोचले. पण त्यांच्या भावाचा प्रवास तिथेच संपला. ते म्हणाले माझ्या डोळ्यांसमोर भावाला गोळी मारली गेली.क्वेटा पोहोचलेल्या नऊ प्रवाशांपैकी एक, महबूब हुसैन म्हणाले, स्फोटानंतर तासभर गोळीबार सुरू होता. नंतर शस्त्रधारी हल्लेखोरांनी सर्व प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढून ओळखपत्राच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले. महबूब म्हणाले, माझ्या जवळच्या व्यक्तीला त्याच वेळी मारले गेले.ते त्यांच्या पाच मुलींची काळजी घेत होते. तेव्हाच त्यांना मारले. ‘दारूगोळा संपल्यानंतर आेलीस ठेवले’ रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने पाक सैन्याच्या दाव्याच्या अगदी उलट माहिती दिली. रेल्वेवर हल्ला झाला तेव्हा ती बोगद्यात नव्हे तर बाहेर होती. त्यांच्या म्हणण्यानुसार अचानक रेल्वे रुळावर स्फोट झाला. त्यामुळे ट्रेन थांबली. ट्रेन थांबताच लाँचर (रॉकेट)धडकू लागले लागले आणि आम्हाला समजले की आता सर्व संपले आहे. एका पोलिस अधिकाऱ्यानुसार पटरी उडवल्यानंतरही हल्लेखोरांनी सतत गोळीबार केला. दारूगोळा संपल्यावर आम्हाला ओलीस ठेवले. ‘सेना व सरकारी कर्मचारी म्हणून गोळी घातली’ क्वेटाला परतलेले मुख्तार म्हणाले, ते ज्या बोगीत होते त्यात २०-२५ हल्लेखोर चढले होते. त्यापैकी दोन व्यक्ती सर्वांची ओळखपत्रे तपासत होती. लष्कर आणि सरकारी कर्मचारी असलेल्यांचे दोन गट तयार करण्यात आले. त्यानंतर त्यांना मारले गेले. एका जवानाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, एका हल्लेखोराने सर्व वर्दीवाल्यांना मारून टाका.