पाक लष्कर अपयशी, बलुचिस्तानात लष्करी कारवाई लवकरच रोखणार:क्वेटात हिंसाचार,बंडानंतर पाऊल उचलण्यासाठी सरकारचा नाइलाज
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये वाढते बंड आणि ताज्या हिंसाचारानंतर पाकिस्तानी लष्कर आणि सरकार अपयशी ठरत आहे. क्वेटा रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यात लष्काराच्या १४ जवानांसह २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर बलुचिस्तानमध्ये सैन्य उपस्थिती आणि प्रशासकीय नियंत्रणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. यादरम्यान, सूत्रांनुसार, पाकिस्तान लष्कराने बलुचिस्तानात लष्करी कारवाईवर बंदी घातली आहे. लष्करानुसार, बलुचिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्करी अभियानाला पूर्णविराम देऊन राजकीय उपाय आणि बलूच लोकांसोबत संवादाचा मार्ग अवलंबला पाहिजे. लष्करानुसार, सरकारला लष्करासोबत मिळून चर्चेचा मार्ग काढला पाहिजे. पाकिस्तान गृह मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनही या संदर्भात सांगितले की, अनेक वर्षांपासून सुरू लष्करी कारवाईने बलुचिस्तानात शांततेएेवजी अस्थिरता निर्माण केली. गृह मंत्रालयालाही लष्करी कारवाईऐवजी राजकीय संवादातून समस्येवर उपाय हवा आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बंडखोरांविरुद्ध बळाच्या वापरामुळे स्थिती आणखी गुंतागुंतीची केली आहे. प्रश्न उपस्थित…. बलुचिस्तानात हिंसाचार वाढीवर पाक लष्करात संतप्त प्रतिक्रिया क्वेटा रेल्वे स्थानकावर झालेल्या हल्ल्यानंतर बलुच बंडखोरांविरुद्ध लष्करी कारवाईचा काय फायदा झाला यावर लष्कराच्या आतमध्येच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानी लष्करातील चर्चेनुसार, लष्कराची उपस्थिती आणखी गुंतागुंतीची बनवली आहे. यामुळे स्थानिक लोकांचा विश्वास सतत कमकुवत होत आहे. सूत्रांनुसार, बलुचिस्तानात लष्करी कारवाई रोखून राजकीय उपाय अवलंबला जावा,असे लष्कराला वाटते. बलुचिस्तानात या वर्षी २४५ हल्ले… गतवर्षीपेक्षा दुप्पट बलुचिस्तान राज्य सरकारमधील एका सूत्राने दै.भास्करला सांगितले की, सीपॅक येाजनेत येणाऱ्या समस्येमुळे चिनी सरकार पाकवर खूप नाराज आहे. हे प्रकरण नियंत्रणात आणण्यासाठी चीनच्या जिनपिंग सरकारने पाकिस्तानच्या शाहबाज सरकारकडे बलुच बंडखोरांशी लवकर करार करण्याचा सल्ला दिला आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, लष्कराच्या कारवाईऐवजी राजकीय मार्ग काढला पाहिजे. या वर्षी बलुचिस्तानात अतिरेकी हल्ल्यांत मोठी वाढ झाली. २०२४ मध्ये सुरुवातीच्या ९ महिन्यांत २४५ अतिरेकी हल्ले नोंदले. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून जास्त आहेत. २०२३ मध्ये संपूर्ण वर्षात ११ अतिरेकी घटना नोंदल्या. या वर्षी बलुच कट्टरपंथीयांनी पाकिस्तानी लष्करी तळ, ग्वादर बंदर आणि अन्य ठिकाणांवर निशाणा साधला आहे. सूत्रांनुसार, पाकमध्ये राजकीय अस्थिरता आणि अफगाणिस्तानातून अमेरिकी लष्कर परतल्यानंतर या गटांना नवी सैन्य क्षमता मिळाली आहे. सांगितले की, अनेक वर्षांपासून सुरू लष्करी कारवाईने बलुचिस्तानात शांततेएेवजी अस्थिरता निर्माण केली. गृह मंत्रालयालाही लष्करी कारवाईऐवजी राजकीय संवादातून समस्येवर उपाय हवा आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बंडखोरांविरुद्ध बळाच्या वापरामुळे स्थिती आणखी गुंतागुंतीची केली आहे.