परभणी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरण:अटकेतील तरुणाचा पोलिस कस्टडीत मृत्यू, 50 जणांना झाली होती अटक

परभणीत संविधान प्रतिकृती विटंबना घटनेनंतर झालेल्या हिंसाचारात अटक केलेल्या तरुणाचा पोलिस कस्टडीत मृत्यू झाला. या घटनेमुळे परभणीत आज पुन्हा वातावरण तापले आहे. परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची दोन दिवसांपूर्वी एका माथेफिरूने तोडफोड केली होती. या घटनेविरोधात आंबेडकरी संघटनांनी बुधवारी बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण मिळाले होते. त्यात जाळपोळ व दगडफेक झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 8 गुन्ह्यांची नोंद करून 50 जणांना अटक केली आहे. पोलिसांवर या प्रकरणी रात्रीच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवल्याचा आरोप झाला होता. पण नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाप यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
बातमी अपडेट करत आहोत…

Share