महाराष्ट्रातील निकाल धक्कादायक व अनपेक्षित:पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

राज्यभरात अनपेक्षित निकाल लागलेले आहेत आणि असे निकाल का लागले हा मला पडलेला प्रश्न आहे माझी अपेक्षाही नव्हती इतका धक्कादायक असा हा निकाल आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कराड दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. कराड दक्षिण मधून पराभूत झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की राज्यभरात असे का घडलं असा मला पडलेला प्रश्न आहे. अगोदरच मतदान यंत्रामध्ये तीस-पस्तीस हजार मते टाकलेली आहेत कि काय अशी शंका यावी असा हा निकाल आहे. यासंदर्भात मला अनेकांचे फोन आलेले आहेत मी काही त्याची चौकशी करावी अशा मागणीच्या भानगडीत पडणार नाही. पण काहीतरी नक्कीच गडबड घोटाळा आहे एवढे मात्र नक्की असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याबद्दल विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की खरोखरच आहे की निकाल धक्कादायक आहे आमच्यातला परस्परांना कमी पडला का? त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकसंघ नव्हतो का या सगळ्याचा आढावा घेतला पाहिजे. टीकाटिपणी म्हणून नाही तर पुढे सुधारणा व्हावी म्हणून याची गरज आहे असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. कराडच्या जनतेने मला भरपूर प्रेम दिलेले आहे. त्यांच्यामुळेच मला दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी काम करण्याची संधी मिळाली. त्यांची सेवा मी यापुढेही करणार आहे. मी पदावर असेल नसेल पण राजकारण मात्र मी सोडणार नाही. राजकीय क्षेत्रात नक्कीच काम करेल असा ठाम विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

Share

-