विरोधकांचा फेक नरेटिव्ह ब्रेक झाला:फडणवीस यांचा महाविकास आघाडीला टोला, हरियाणातील विजयाचा दिला दाखला

हरियाणाच्या निवडणुकीमुळे फेक नॅरेटीव्ह ब्रेक झाला. लोकसभेत भाजपा संविधान बदलवणार असल्याचा फेक नॅरेटीव्ह विरोधकांनी तयार केला होता. या निवडणुकीत तो संपुष्टात आला. लाेक भाजपाच्या पाठिशी आहेत हे स्पष्ट झाले आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना महाविकास आघाडीला हाणला. भाजपा हरियाणात पराभूत होईल. मग भाजपावर हल्ला करण्यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस शस्त्र परजावून बसले होते. पण, आता देशाचा मूड काय हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कालपर्यत “हम साथ साथ है’ असे म्हणणारे आज “हम तुम्हारे है कौन’ असे म्हणत आहेत अशी टीका केली. मी वित्तमंत्री असताना आठ नवीन मेडिकल काॅलेजेसची घोषणा केली होती. त्यातील पाच विदर्भातील आहेत. बुधवारी त्यांचे भूमिपूजन झाले. कार्गो आणि पॅसेंजरची व्यवस्था असणारे आधुनिक विमानतळ नागपुरला मिळेल. शिर्डीला देखील मोठे विमानतळ मिळणार आहे. महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. ८० टक्के पेपर सोडवला आहे. २० टक्के सोडवल्या नंतर सगळ्यांना सांगू. ओबीसींसाठी ३६ वसतिगृह तयार करू असे मी सांगितले होते. त्या नंतर आलेल्या मविआ सरकारने आम्ही ७२ वसतिगृह बांधू असे सांगितले होते. पण, एकही बांधले नाही. बुधवारी एकाच दिवशी ५२ वसतिगृहांचे उद्घाटन केले, असे फडणवीस म्हणाले.

Share

-