पुण्यात ऑर्थोपेडिक वॉकेथॉन संपन्न:हाडांचे आरोग्य राखण्याचा संदेश

देशात हाडांच्या आणि सांध्याच्या आराेग्याकडे नागरिक सातत्याने दुर्लक्ष करत असतात त्यामुळे ऑस्टिओपाेरेसिस (हाडांची घनता खराब हाेणे) व ऑस्टिओआर्थरायटिस (खराब संयुक्त आराेग्य) समस्या वाढत आहे. जीवनदायी आराेग्यासाठी हाडांची निगा राखणे व हाडांचे आराेग्याकडे लक्ष्य देणे महत्वाचे आहे याबाबत जागृती करण्यासाठी पुण्यात प्रथमच ऑर्थाेपेडिक वाॅकथाॅनचे आयाेजन पुना क्लब याठिकाणी करण्यात आले होते. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार , डॉ. प्रदीप मुनोत, शैलेश रांका, रिथिम वाघोलीकर, राकेश जैन यांनी वाॅकथाॅनला हिरवी झेंडा दाखवल्या नंतर स्पर्धकांच्या उपस्थितीत जल्लोषात वाॅकथाॅन पार पडला. तब्बल साडेचार हजार जणांनी या वाॅकथाॅनसाठी नोंदणी केली होती.वाॅकथाॅन मध्ये सहभागी हाेणाऱ्यांसाठी टीशर्ट, मेडल्स व नाश्ता, प्रमाणपत्र याची व्यवस्था करण्यात आली होती. याबाबत आयोजक शिल्पा मुनोत यांनी सांगितले की, मुंबईतील फूट एंकल क्लिनिकच्या सहकार्याने देशात प्रथमच ऑर्थाेपेडिक वाॅकथाॅनचे आयाेजन विविध शहरात करण्यात आले आहे. फाउंडेशनने सहा राज्यांमध्ये विशेष 30 ऑर्थोपेडिक शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया, जागरूकता शैक्षणिक कार्यक्रम आणि सामुदायिक उपक्रम आयोजित केले आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, हैद्राबाद व जाेधपूर या पाच शहरात हे वाॅकथाॅन आयोजित करण्यात आले.तीन किमी व पाच किमी वाॅकथाॅनचे आयाेजन करण्यात आले. “ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टियोआर्थरायटिसच्या वाढीमुळे, चालण्यामुळे हाडांचे प्रमाण वाढण्यास आणि त्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे भारताने “चालणे हे नवीन व्यायाम” केले पाहिजे.चालणे हा दैनंदिन जीवनाचा भाग नागरिकांचा बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मत याप्रसंगी डॉ. प्रदीप मुनोत यांनी व्यक्त केले. यावर्षी ऑर्थोपेडिक वॉकाथॉन, एसबीआयद्वारे प्रायोजित आणि वेंकिज यांच्या साह्याने संपन्न झाली.ताज , क्यूमीन, गो ३६५ बाय चरक, पूनावाला ग्रीन इनिशिएटिव्ह, बिसलेरी संस्कृती आणि एमकेएफएसी हे यावेळी भागीदार होते.

Share