राहुल गांधी प्रगल्भ नेते म्हणून कधी उदयास आले नाही:अमेरिकेत जाऊन देशाला शिव्या देऊन काही होत नसतं, डॉ. किरण रिजिजू यांची टीका

देशाच्या स्वातंत्र्यानंतर ‘संविधान दिवस ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशात प्रथम सुरू केला. ७५ वर्ष मुस्लिम समजास देखील काँग्रेसने व्होट बँक म्हणून राजकारणात वापर केला. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी नेहमी जात व धर्म बाबत राजकारण केले आहे. राहुल गांधी प्रगल्भ नेते म्हणून कधी उदयास आले नाही कारण त्यांच्या अंतर्मनातून कधी तशी भावना निर्माण झाली नाही. अमेरिका मध्ये जाऊन देशाला शिव्या देऊन नेता होऊ शकत नाही. देश जनतेचा असून कोणत्या एका परिवाराचा नाही. काँग्रेससाठी एक परिवार महत्वाचा आहे पण आमच्यासाठी देश प्रथम आहे. काँग्रेस काळात गरीब देश म्हणून भारताला हिणवले जात होते पण मोदी यांच्या काळात बदल होऊन देशाचा मान जगात वाढला आहे असे मत संसदीय कार्य मंत्री डॉ. किरण रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, निवेदिता एकबोटे , अतुल सावे, मिलिंद कांबळे उपस्थित होते. डॉ. किरण रिजिजू म्हणाले, पुण्यात येणे मला खूप आवडते कारण हे ऊर्जेचे केंद्र आहे. महाराष्ट्र मधील निवडणूक देशाचे दृष्टीने महत्वाची आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असून देशात उद्योग निर्मिती केंद्र महाराष्ट्र आहे. लोकसभा निवडणुकी नंतर विधानसभा निवडणुक पर्यंत अनेक गोष्टी बदललेल्या आहे. काँग्रेसला लोकसभामध्ये जनतेची दिशाभुल करून काही मते मिळाली होती पण आता त्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे त्यांना आता जनता समर्थन मिळणार नाही. महायुतीला राज्यात बहुमत मिळेल असे सध्या दिसून येत आहे. मुंबई मध्ये मी अनेक वर्ष आलो आहे आज मुंबई जागतिक शहर बनले आहे. डॉ. किरण रिजिजू म्हणाले अनेक पुल, उड्डाणपूल, बोगदे, रस्ते यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलला आहे. समृध्दी महामार्गमुळे नागपूर देखील जवळ आले आहे. लाडकी बहिण योजना मुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला असून त्या खुश आहे. गरिबांना देखील न्याय देण्याचे काम जनतेने केले आहे. काँग्रेसचा गट यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी काही घोषणा सुरू केल्या पण त्यावर आता मतदार यांचा विश्वास नाही. गरीबी हटाओ नारा काँग्रेसने दिला पण त्याची पूर्तता मोदी सरकारने केली. सिमावर्ती भागात मी राहतो चीन सोबत जाणारे रस्ते अस्तित्वात नव्हते पण मोदी यांनी पक्के रस्ते सर्व ठिकाणी तयार करून पायाभूत सुविधा निर्माण केल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूर मध्ये बनावट पुस्तक हातात धरून संविधान नारा दिला पण आम्ही त्यांचा बनाव उघड केला.

Share