राहुल गांधी 14 वर्षांनंतर कोल्हापुरात:शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, कारण या लोकांची नियत चांगली नव्हती, राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात

काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळी कोल्हापूरच्या दौऱ्यावर पोहोचले. तब्बल 14 वर्षांनंतर ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेत. या दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर आता ते संविधान सन्मान परिषदेलाही हजेरी लावणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी राहुल गांधी यांनी कोल्हापुरातील काँग्रेस कार्यकर्ता असणाऱ्या एका टेम्पो चालकाच्या घरी भेट दिली. तिथे त्यांनी स्वयंपाक करून या कुटुंबासोबत जेवणाचा आस्वाद घेतला. तसेच त्यांची आस्थेवाईकपणे चौकशीही केली. राहुल यांचा हा दौरा विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे. त्यामुळे त्यांनी दलितांना आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांच्या भूमीतून महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडल्याची चर्चा आहे.

Share