धारावीची जमीन घेता, कुलाब्याची का घेत नाही?:राहुल गांधी यांचा मोदींना सवाल; म्हणाले – हे शक्य होणार नाही, इथे राहुल गांधी उभा आहे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतील धारावीची जमीन उद्योगपती गौतम अदानी यांना देण्याच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मोदी, शहा व भाजपच्या लोकांना धारावीची 1 लाख कोटींची जमीन अदानींना द्यायची होती. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार चोरले. तुमच्या डोळ्यांदेखत कोट्यवधी रुपये देऊन आमदारांची खरेदी केली गेली आणि हे सरकार पाडले गेले, असे ते म्हणालेत. राहुल गांधी आपल्या अमरावती येथील सभेत बोलताना म्हणाले की, हे सरकार धारावीची जमीन घेते, पण कुलाब्याची का घेत नाही? कारण कुलाब्यात दलित, आदिवासी, ओबीसी व आदिवासी नव्हे तर श्रीमंत लोक राहतात. त्यामुळे त्यांनी गरिबांच्या धारावीची निवड केली. मी भूसंपादन कायद्यावर भाष्य केले तेव्हा अदानी व अंबानींचे लोक माझ्या मागे लागले. माझी प्रतिमा मलीन करण्यात आली. मला बदनाम केले गेले. यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. धारावची कोट्यवधी रुपयांची जमीन उद्योगपतींच्या घशात जात असेल, तर तेवढेच पैसे गरिबांच्या खिशात गेले पाहिजे. इथे राहुल गांधी उभा आहे सरकार व उद्योगपतींना गरिबांची जमीन पाहिजे, पाणी पाहिजे, जंगल पाहिजे. त्यांना तुमच्याकडील सर्वकाही हवे आहे. देशात निवडक 25 अब्जाधीश आहेत. या सरकारने त्यांना 16 लाख कोटींचे कर्जमाफी दिली. आम्ही याऊलट शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता. अदानींना धारावीत 1 लाख कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यांना वाटते हे सहज शक्य होईल. पण असे होणार नाही. कारण इथे राहुल गांधी उभा आहे, असेही राहुल गांधी यावेळी मोदी सरकारला इशारा देत म्हणाले. आज शिवाजी महाराज असते तर… ते पुढे म्हणाले, अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ करण्याचे संविधानात कुठे लिहिले आहे? संविधान हे शिवाजी महाराजांचे आहे. आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी स्वतःचे बलिदान दिले असते, पण गरीबांच्या जमिनी जाऊ दिल्या नसत्या. धारावीची जमीन जाऊ देऊ दिली नसती. त्यांनी या जमिनीचे संरक्षण केले असते. मोदी, शहांनी सर्वांच्या डोळ्यांदेखत कोट्यवधी रुपये देऊन आमदार खरेदी केले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पाडले. या प्रकरणात दिलेले पैसे आकाशातून पडले नव्हते. भारतात कुणीही कुणाला 40-50 कोटी रुपये देत नाही. या प्रकरणात धारावीच्या जमिनीचा सौदा झाला. या जमिनीच्या मोबदल्यात आमदारांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. हे पैसे कुणी दिले, आदेश कुणी दिले हे अवघ्या देशाला माहिती आहे. यामागे कोण होते हे महाराष्ट्रातील 6 वर्षांचा मुलगाही सांगेल. या प्रकरणी कुणालाही काही सांगण्याची गरज नाही, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर महिलांना दरमहा 3 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचेही आश्वासन दिले. महाराष्ट्रात आमचे सरकार आले तर डिसेंबरच्या पहिल्या तारखेला तुमच्या खात्यात 3 हजार रुपये आलेले असतील. मोदी उद्योगपतींच्या खात्यांत पैसे टाकतात. पण आम्ही सर्वसामान्य महिलांच्या खात्यांत पैसे टाकू, असे ते म्हणाले. हे ही वाचा… पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्मृतिभ्रंशाचा आजार:ते बंद खोलीत संविधानाची हत्या करतात, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमरावतीत घणाघात
अमरावती – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृतिभ्रंशाचा गंभीर आजार जडल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी अमरावती येथील प्रचारसभेत बोलताना केली. पंतप्रधान मोदींना स्मृतिभ्रंशाचा आजार झाला आहे. त्यामुळेच ते आरक्षण व जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून माझ्यावर टीका करत आहेत, असे ते म्हणालेत. राहुल यांनी यासंबंधी अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांचा दाखला दिला. बायडेन अनेकदा आपल्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे विसरत होते, असे ते त्यांचा नामोल्लेख टाळत म्हणाले. वाचा सविस्तर