रमजान महिन्यात हॉटेल बंद करताहेत कट्टरपंथी:महिलांवर मॉरल पोलिसिंग, कट्टरपंथीयांची मनमानी, युनूस सरकारवर निष्क्रियतेचा आरोप

ढाका विद्यापीठातील कर्मचारी मुस्तफा आसिफ अर्नब यांनी एका विद्यार्थिनीवर अभद्र टिप्पणी केली. तिला हिजाब व्यवस्थित घालण्यास सांगितले. विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली, तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. पण रात्री ‘तौहीदी जनता’ नावाच्या कट्टरपंथी गटाने शाहबाग पोलीस स्टेशनला घेरले व आरोपीला सोडवून आणले. तक्रारदार विद्यार्थिनीचा फोन नंबर आणि पत्ता घेण्यात आला. पीडितेला सोशल मीडियावर धमक्या मिळू लागल्या आहेत. तख्तपालटचा कट, पाकिस्तानी निकटवर्तीय लष्कर जनरलसह १३ अधिकाऱ्यांवर निगराणी बांगलादेशमध्ये पाकिस्ताच्या जवळच्या लेफ्टिनेंट जनरल फैजुर रहमानसह १३ अन्य लष्करी अधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर तख्तपालटाचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यांना बांगलादेशचे सैन्य गुप्तचर डीजीएफआयच्या निगराणीखाली ठेवले आहे. सूत्रांच्या मते, रहमान यांनी पाक राजनयिक आणि जमात नेत्यांसोबत अनेक बैठक घेतल्या. या बैठकींचा उद्देश सेना प्रमुख वकर-उज-जमान यांच्या विरोधात समर्थन मिळवणे होता, परंतु त्यांना पुरेसे समर्थन मिळाले नाही. साध्या कपड्यांत तैनात सुरक्षा दल अन् कट्टरपंथी महिलांना हिजाबसाठी दबाव बांगलादेशमध्ये बाजारपेठेपासून विद्यापीठ कॅम्पसपर्यंत महिलांवर मोरल पोलिसिंग होत आहे. साध्या वेशातील सुरक्षा कर्मचारी आणि कट्टरपंथी कार्यकर्ते महिलांना हिजाब आणि योग्य कपडे घालण्यास दबाव टाकत आहेत. काही दिवसांपूर्वी ढाकाच्या श्यामोलीमध्ये एका युवकाने सेक्स वर्कर्सवर हल्ला केल्याचा व्हिडिओ ्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला युवकाच्या पायाला पकडून माफी मागताना दिसते. तरीही पोलिसांनी कारवाई केली नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी ‘महिलांच्या विरोधातील हिंसेवर महिला’ संघटनेने मानव साखळी तयार केली. बांगलादेशमध्ये रमजानच्या काळात कट्टरपंथी ताकद वाढत आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ता समाप्तीनंतर डॉ. मुहंमद यूनूस यांच्या अंतरिम सरकारवर निष्क्रियतेचे आरोप होत आहेत. कट्टरपंथी संघटनांचे हल्ले वाढले आहेत. त्यांनी रोजाच्या वेळी दुकाने बंद केली नाहीत तर ती जबरदस्तीने बंद केले जातील. महिलांवर मोरल पोलिसिंग होत आहे, त्यांना हिजाबशिवाय बाजारात फिरण्यास मनाई केली जात आहे. रमजानच्या पहिल्या दिवशी जमात-ए-इस्लामीचे अमीर डॉ. शफीकुर्रहमान यांनी सरकारकडे दिवसा हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद करण्याची मागणी केली. २ मार्च रोजी चांदपूर जिल्ह्यात बाजार समितीने खाद्य दुकाने आणि हॉटेल्स बंद करण्याचे आदेश दिले. मदारीपूरमध्येही हॉटेल्स बंद करण्याचा इशारा देण्यात आला.

Share