रंगपंचमीला आनंदाच्या रंगात रंगले विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व कर्मचारी:जामनेरातील लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूलमध्ये रंगोत्सवाचे उत्साहात आयोजन

येथील लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होळीनिमित्त गुरुवारी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या रंगोत्सवात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही रंग लावून विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. येथील लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्षभरात येणारे पोळा, रक्षाबंधन, गणेशोत्सव, ख्रिसमस असे धार्मिक सण-उत्सव साजरे केले जातात. गुरुवारी होळी व शुक्रवारी धूलिवंदन आहे. शुक्रवारी शाळेला सुट्टी असल्याने गुरुवारीच शाळेत रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगीताच्या तालावर नाचत मित्र, मैत्रिणी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध रंगांनी रंगवून विद्यार्थ्यांनी धुलिवंदनाचा आनंद घेतला. यावेळी मुख्याध्यापक धनंजय सिंग यांनीही मुलांसोबत नृत्य करत रंगांची मुक्त उधळण केली. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, सहभागी झाले होते. विद्यार्थी वर्षभर अभ्यासाच्या तणावाखाली असतात. हा तणाव काही कमी व्हावा, यासाठी सण उत्सव साजरे केले जातात. अशा कार्यक्रमांमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नाते अधिक घट्ट होते. असे मुख्याध्यापक धनंजय सिंग यांनी सांगितले.

Share