रस्ता उपक्रमात श्रमदान, रस्ते चकाचक:लॉयन्स क्लब खामगाव, तरुणाई फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

लॉयन्स क्लब खामगाव, तरुणाई फाउंडेशन, नगर परिषद खामगाव, गो.से. महाविद्यालय, नव संकल्प ग्रुप, हिंदुस्तान युनी लिव्हर व अनेक सेवाभावी संस्थांद्वारे हाती घेतलेला उपक्रम म्हणजे सुंदर माझा रस्ता. सदर उपक्रमांतर्गत नांदुरा बायपास ते अकोला बायपास हा जवळपास सात किलोमीटरचा रस्ता दुभाजकामध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करून हिरवागार करण्याचा संकल्प खामगावकरांनी घेतला आहे. या उपक्रमांतर्गत लायन्स क्लब खामगावचे सुंदर माझा रस्ता उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख लॉयन प्रदीप जांगिड यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी ६.३० ते ८ दरम्यान श्रमदान करून वृक्ष संवर्धन केले जाते. सदर उपक्रमाला योगदान लाभावे, या भावनेतून गो. से. महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटने विकमशी चौक ते बाळापूर नाका यादरम्यान वृक्षारोपण, झाडांची निगा, दुभाजकांमधील स्वच्छता इत्यादी करिता श्रमदान केले. याकरिता गो से महाविद्यालयाच्या रोहिणी धरमकार व एनसीसी चमूचे महाविद्यालयाचे प्राचार्य लॉयन डॉ. धनंजय तळवणकर यांनी व लायन्स क्लब खामगावचे अध्यक्ष एमजेएफ लॉयन परदेशी, कोषाध्यक्ष राहुल भट्टड, प्रदीप जांगिड व सर्व सुंदर माझा रस्ता टीम ने कौतूक केले, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे. २५ विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग गो. से. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनाचे सुमारे २५ विद्यार्थ्यांचा चमू, प्राध्यापिका रोहिणी धरमकार यांच्या नेतृत्वात विक्रमशी चौकामध्ये श्रमदान करण्यासाठी सहभागी झाला होता. लायन्स क्लबचे प्रदीप जांगिड,संजय पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली दुभाजकांमधील कार्याला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी अतिशय स्फूर्तीने झाडे लावणे, दुभाजकांमधील अनावश्यक तन काढणे, झाडाला व्यवस्थित आधार देण्यासाठी बांबू लावणे इत्यादीद्वारे श्रमदान केले.

Share

-