रविदासांच्या दोह्यांमध्ये राज्यघटनेचे प्रतिबिंब:प्रा. डॉ. गणेश बोरकर; चर्मकार समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिंचा सत्कार

प्रतिनिधी | अकोला तथागत गौतम बुद्ध व संत शिरोमणी रविदासांचे विज्ञानवादी व वास्तववादी विचारांचा प्रचार व प्रसाराकरता चर्मकार समाजातील उच्चशिक्षीत मंडळीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. रविदासांच्या दोह्यांमध्ये राज्यघटनेचे प्रतिबिंब दिसून येते, असे प्राचार्य डॉ. गणेश बोरकर म्हणाले. ते ज्येष्ठ नागरिक विचार मंच अकोला यांच्या वतीने आयोजित चर्मकार समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिंच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. सम्यक संबोधी सभागृहात आयोजित कार्यक्रमात समाजातील उच्चशिक्षित एकूण ३२ आचार्यांना समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रभु चापके होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाजिक कार्यकर्ता अशोक इंगळे, ज्येष्ठ नागरीक विचार मंचाचे अध्यक्ष रामभाऊ ताजने, माजी प्राचार्य निर्मला भामोदे, माजी प्राचार्य विजय काकडे व राम गव्हाळे हे होते. अतिथींनी या प्रसंगी समयोचित भाषणे झाली. प्रास्तविक भाषणात सेवा निवृत्त उपकुलसचिव रामभाऊ शेगोकार केले. त्यांची ज्येष्ठ नागरिक संघाची भूमिका व उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य प्रभु चापके यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये रोजगार निर्मिती कुठेही दिसत नाही, याबाबत त्यांची चिंता व्यक्त केली. कार्यक्रमात समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यात डॉ. प्रविण इंगळे, डॉ. महेश तुंबडे, डॉ. अविनाश थोटे, डॉ. विवेक चापके, डॉ. उमेश चापके, डॉ. संजय टाले, डॉ. गजानन डोईफोडे, डॉ. राजकुमार वझिरे, डॉ. आप्पा डामरे, डॉ. प्रदीप डामरे, डॉ. धनंजय खिराडे, डॉ. संतोष सुरडकर, डॉ. नीलेश वझिरे, डॉ. गजानन वझिरे, डॉ. सुनिल पटके, डॉ. ओमप्रकाश राखोंडे, डॉ. नितीन पतके यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुसुधन गव्हाळे व आभार आर. एम. शेगोकार यांनी मानले. कार्यक्रमाला निरंजन गव्हाळे, मधुकर वानेटकर यांच्यासह चर्मकार समाजातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी होते. यांचा केला सत्कार महिला दिनी नारी शक्तिचा सन्मान महिला दिनाचे औचित्य साधुन आचार्य पदवी प्राप्त केलेल्या व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला. यात डॉ. कांचन शेकोकार, डॉ. विठ्ठल चोपडे, डॉ. स्नेहल चिमणकर, डॉ. प्रिती चापके, डॉ. सोनाली चापके, डॉ. जया वझिरे, डॉ. प्रेमलता चंदन, डॉ. ज्योती शेगोकार, डॉ. संगीता शेगोकार, डॉ. सोनाली नाचणे यांचा सत्कार केला.

Share