घरोघरी भजने गाऊन महिला करताहेत प्रबोधन:घाटनांद्रा येथील रेणुकामाता महिला भजनी मंडळाचा दहा दिवस अनोखा उपक्रम

घाटनांद्रा परिसरात घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये नवरात्रीचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. तसेच नवरात्र उत्सव काळात नवरात्रीचा जागर जोगवा म्हणून पूर्वापार चालत आलेली येथील रेणुकामाता महिला भजनी मंडळाची परंपरा या भजनी मंडळाने आजही कायम सुरू ठेवली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त घरोघरी भजने गाऊन महिला भगिनी प्रबोधन करत आहेत. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घाटनांद्रा येथील महिला भगिनींकडून नवरात्रीचा जागर म्हणून दहा दिवस एक उपक्रम राबविला जात आहे. यात एकमेकांच्या घरोघरी जाऊन भजने, जोगवा, भारुड, गवळणी आदी प्रकारचे भजने गाऊन देवीसमोर जागरण करत देवीचे नामस्मरण केले जाते. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा येथील महिला भगिनींनी आजही कायम टिकवून ठेवली आहे. नवरात्र उत्सव काळात रोज वीस ते पंचवीस महिला भगिनी एकत्रित येऊन देवीचे नामस्मरण करत आहेत. तर, भजनामध्ये रंगत यावी, यासाठी काही हौशी महिला भजन सादर करताना महिला. छाया ः राम जोशी. आत्मिक समाधान भजनामधून मनाला एक आत्मिक समाधान मिळते. भजनामधून एकता निर्माण होत असल्याचे स्वाध्याय परिवाराच्या मिनाताई जोशी यांनी सांगितले. तर, कित्येक वर्षांपासून सुरु असलेली ही भजनाची परंपरा आम्ही अशीच कायम टिकवून ठेवू, असे रेणुका माता महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा संगीता देशपांडे यांनी सांगितले. भजनामध्ये पावली, फुगड्या खेळून भजनाची शोभा वाढवतात. सुरुवातीला ५ महिलांनी सुरू केलेल्या या भजनाच्या कार्यक्रमात आज २० ते २५ महिला सहभागी झाल्या आहेत. वृद्ध महिलांपासून ते तरुण महिला, मुलीही भजनाच्या कार्यक्रमात सहभागी होतात. कार्यक्रमासाठी उल्का देशपांडे, मंगलबाई कोठाळे, अर्चना देशपांडे, दीपाली जोशी आदींनी पुढाकार घेतला आहे.

Share

-