संत बाळू मामांच्या पालखीला उत्साहात सुरुवात:सोहळा लिंबागणेश मुक्कामी, भाविकांनी मनोभावे केले स्वागत

बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे काल दि.१० वार शनिवार रोजी श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या मेंढी माऊली आणि पालखी सोहळ्याचे मुळुकवाडी येथील मुक्काम उरकुन लिंबागणेश येथे पालखी सोहळ्याचे ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजी करत भाविकांनी तर महिला भगिनींनी सडासमार्जन करून रांगोळी काढत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी लिंबागणेश मुक्कामी विसावली आहे. याबाबत माहिती देताना श्री संत बाळूमामा पालखी सोहळ्याचे प्रमुख गुरव कारभारी आप्पा माळी म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १९ पालख्या आहेत. त्यात जवळपास ३ लाख मेंढी असुन लिंबागणेश मुक्कामी पालखी बग्गा नंबर ९ असुन यामध्ये ३००० मेंढी आहेत. लिंबागणेश पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी श्री संत बाळु मामांच्या मेंढी माऊलींना पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. लिंबागणेश येथील शेतकऱ्यांनी आवर्जून बाळु मामांच्या मेंढ्यांना आपल्या शेतात नेऊन चारा खाण्यास घालत आहेत. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने दररोज सकाळी ९ वाजता श्रींची आरती व महाप्रसाद , सायंकाळी ६ ते ७ यावेळेत हरिपाठ आणि सायं ७ ते रात्री ९ कालावधीत बाळु मामांच्या जीवन चरित्र पर किर्तन होऊन रात्री ९ वाजता आरती व त्यानंतर महाप्रसाद असे नियोजन पंचक्रोशीतील भाविक भक्तांकडून करण्यात आले आहे.

Share

-