संभाजीनगर आगारात 10 नवीन ई-बस दाखल:चिखली, मेहकर, शिर्डी, नाशिकला धावणार, शिवशाहीपेक्षा ई बसचे भाडे जास्त

मध्यवर्ती आगाराला आणखी १० ई बस दाखल झाल्या आहेत. एकूण ३८ ई बस झाल्या आहेत. नवीन आलेल्या ५ ई बस चिखली, १ मेहकर आणि चार शिर्डी व नाशिक मार्गावर धावणार आहेत. शिवशाही पेक्षा ई बसचे भाडे जास्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतानुकूलित बस मध्ये आरमदायी प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागणार आहे. ध्वनी व वायू प्रदूषण कमी करणे, पेट्रोल व डिझेलला सक्षम पर्याय म्हणून केंद्र सरकारने ई बस धोरण राबवण्याचा निर्धार केला आहे. त्याची सर्वत्र अंमलबजावणी सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाला गुरूवारी दहा नवीन ई बस मिळाल्या आहेत. त्या बारा मीटर लांबीच्या म्हणजेच ४४ आसनी बस आहेत. त्या लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पूर्वी नऊ मीटर लांबीच्या म्हणजेच चौथीस आसनी अठ्ठावीस ई बस मिळाल्या असून त्या जालना, सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर, बीड आदी मार्गावर धावायला सुरूवात झाली आहे. ई बस मधून महिलांना ५० टक्के भाडे सवलत, ज्येष्ठांना अर्धे भाउे व ७५ वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवास आदी सेवासवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वातानुकूलित बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. मार्गाचे नाव ईबस शिवशाही साधी बस भाडे छ. संभाजीनगर ते चिखली ३३५ ३१० २१० मेहकर ३४५ ३२० २२० जालना १३० १३० ९० शेवगाव १८० १८० १३० सिल्लोड १४५ १४५ १०० राजुर १८० १८० १३० शिर्डी व नाशिकच्या बसचे फिटनेस बाकी असून ते पूर्ण झाले की भाडे व वेळ निश्चित केली जाणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक पंडित चव्हाण यांनी दिली.

Share

-