सांगलीत हृदय पिळवटनारी घटना:अपघातात आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचे झाले तुकडे
सांगली शहरातील कुमठेफाटा जवळ भीषण अपघात झाला असून यात आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ओव्हरटेक करत असताना दुचकीला वडापने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघात होताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र या दुर्दैवी अपघातात आईसह 2 मुलांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचालक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. ओव्हरटेकच्या नादात तासगाव-सांगली मार्गावरील कुमठेफाटा येथे वडापने समोरून येणाऱ्या दुचकीला जोराची धडक देत उडवले. यात दुचाकीवरील आई व तिच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. या महिलेचा पती गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरील दाम्पत्य हे आपल्या मुलांसह सांगलीहून आटपाडी गावाकडे निघाले होते. आटपाडी गावाकडे जाताना तासगाव- सांगली रोडवरील कुमठेफाटा जवळ आले असता ओव्हरटेक करणाऱ्या वडापने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. या अपघातात दुचाकीवरील आई आणि तिच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर या महिलेच्या पतीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महिलेच्या पतीची प्रकृती देखील चिंताजनक असून सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलिसांना देखील या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी दाखल झाले व या संपूर्ण घटनेचा त्यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यात देखील समुद्रपूर तालुक्यात शेडगाव चौरस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरकडून भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने महिलेस धडक दिली. या अपघातामुळे तणाव निर्माण झाला होता. अपघातात मृत झालेल्या महिलेचे सुधाबाई मणिक झाडे असे नाव असून त्या 55 वर्षांच्या होत्या. पुलाच्या कामावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या पतीसाठी त्या जेवणाचा डबा घेऊन जात असताना हा अपघात झाला.