डुकराला कितीही साबण शांपू लावले तरी गटारीतच जाते:संजय राऊत महाविकास आघाडीचे कुत्रे, सदाभाऊ खोतांची पुन्हा जीभ घसरली
महायुतीचे आमदार सदाभाऊ यांनी शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते. ते प्रकरण तापलेले असतानाच त्यांनी आता खासदार संजय राऊत यांच्यावर देखील खालच्या पातळीवर टीका केली आहे. डुकराला कितीही साबण शांपू लावला तरी डुक्कर गटारीतच जाते, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सदभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यात संजय राऊत यांनी थोबाडीत द्यायला हवी होती, अशी टीका त्यांच्यावर केली होती. यावर संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना सदभाऊ खोत म्हणाले, 2019 मध्ये तुम्ही भाषण करत होता. सत्तेत आल्यावर तुम्ही पहिला खंजीर हातात घेतला. तुमच्यात इमानदारपणा आहे का शोधा आणि कुत्र्याएवढा जरी इमानदारपणा असता तर महाराष्ट्राने तुमचे कौतुक केले असते. तरीही मला त्याच्यावर जास्त काही बोलायचे नाही कारान डुकराला कितीही साबण शांपू लावला तरी डुक्कर गटारातच जातं, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर केली. सदभाऊ खोत पुढे म्हणाले, संजय राऊतला गावगाडा माहिती नाही, त्यामुळे राखण करणारा कुत्रा म्हणजे काही माहित नाही. पण तुम्ही 2014 आणि 2019 ला नरेंद्र मोदी यांचा फोटो गळ्यात अडकवून मतांचा जोगवा मागत गावोगावी फिरत होतात. अशा शब्दात सदभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. त्यामुळे आधीच शरद पवारांवरील वादग्रस्त टीकेमुळे चर्चेत आलेले खोत पुन्हा एकदा आता चर्चेत आले आहेत. संजय राऊत काय म्हणाले होते?
सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत म्हणाले, यांचे महाराष्ट्रासाठी योगदान काय? टीका करायला लोकशाहीत हरकत नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच करतो. फडणवीस महाराष्ट्राचे शत्रू आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे राज्य सुसंस्कृत, संयमी आहे. हे संतांचे राज्य आहे. हे चांगल्या राजकारण्यांचे राज्य आहे. फडणवीस आणि त्यांच्या टोळीने हे राज्य संपवले. देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती. पण तेफिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते, तुम्ही कधीतरी या राज्याचे मुख्यमंत्री होता आणि आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतात.