संजय राऊतांचे राज ठाकरे, अजित पवार, भुजबळांना प्रत्युत्तर:ठाकरे सरकार पाडण्यासाठी अदानीसोंबत बैठका; निवडणूक आयोगावर दबाव असल्याचाही दावा

उद्धव ठाकरे यांनी अदानींसोबत हातमिळवणी केली असती तर आमचे सरकार पडले नसते, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांच्या आरोपांना देखील प्रत्युत्तर दिले आहे. सरकार पाडण्यासाठी अदानी, फडणवीस, अजित पवार, अमित शहा यांच्या वारंवार बैठका झाल्या असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे. भाजपसोबत जाण्यासाठी गौतम अदानी यांच्या निवासस्थानी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पाच बैठका झाल्या असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यांच्या या दाव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या बैठकांना शरद पवार नव्हे तर अजित पवारच उपस्थित असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. गौतम अदानी यांना मुंबई मिळवायची असल्यानेच ठाकरे सरकार पाडण्यात आले, अशी कबुली अजित पवार यांनी दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही गौतम अदानींसोबत हातमिळवणी केली असती तर आमच्या बॅगेतही पैसे निघाले असते. मात्र, आम्ही त्यांच्यासोबत हातमिळवणी केली नाही. त्यामुळे आमच्या बॅगेत पैसा निघत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, जिथे पैसे पोहोचवायचे होते, तिथे शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी पैसे पोहोचवले आहेत. पैशांचे वाटप देखील सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वस्तूंचे वाटप करून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. भुजबळांनी त्या वेळी मंडल आयोगाचे कारण सांगितले छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांनी मंडल आयोगाचे कारण दिले होते. मात्र आता ते विसरले नसतील, असे मला वाटते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही गौतम अदानींनी फोडली असे अजित पवार यांनी मान्य केले आहे. अदानींना मुंबई लुटायची आहे. आणि त्यासाठी शिवसेना हा सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे शिवसेना फोडण्यात आली असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवारांनी त्या वेळी शिवसेनेत फूट पाडली असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. त्याला आता राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांची बॅग तपासणी विमानतळावरील देवेंद्र फडणवीस यांचा बॅग तपासणीचा व्हिडिओ हा विमानतळावरचा आहे. विमानतळावर सर्वांच्या बॅगांची चेकिंग होते. हे लोक काय बोलतात, त्यांनाही समजत नाही. विमानतळावर तर पंतप्रधान जरी गेले तरी त्यांच्या बॅगेची देखील तपासणी होते. तिथे स्कॅनिंग मशीन असते. त्यांना काय बोलतात हे समजत नाही. निवडणूक आयोग हे शहा आणि फडणवीस यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरेंनी आम्हाला मराठी शिकवू नये राज ठाकरे यांनी आम्हाला भाषा शिकवू नये आणि मराठी तर अजिबात शिकवू नये. राज ठाकरे यांचे भाषण काढून पाहिले तर त्यांची भाषा तुम्हाला समजेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही ज्या हेडमास्तरांकडे मराठी भाषा शिकलो तसा हेडमास्तर पुन्हा झाला नाही. त्या हेडमास्तराचे नाव बाळासाहेब ठाकरे होते, हे त्यांनी लक्षात ठेवावे. अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. उद्धव ठाकरे यांच्या कडून अपप्रचार करण्याचा प्रयत्न:देवेंद्र फडणवीसांचे व्हिडिओला व्हिडिओने प्रत्युत्तर; 5 नोव्हेंबरची घटना असल्याचा दावा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात येत आहे. याचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून सरकार तसेच निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील बॅग तपासणी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र हा व्हिडिओ पाच नोव्हेंबरचा असून या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… मोदी भान सुटल्याप्रमाणे बोलतात:भक्त टाळ्या वाजवून फेकुगिरीस प्रोत्साहन देतात; उद्धव ठाकरे गटाचा थेट पंतप्रधानांवर हल्ला 370 कलमाचा विषय महाराष्ट्राच्या व झारखंडच्या निवडणुकीत आणायचे कारण नाही. तरीही मोदी महाराष्ट्रात 370 कलमाचा बुलबुलतरंग वाजवीत आहेत. कारण त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. महाराष्ट्रात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला तो मोदींच्या धोरणांमुळे. महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग गुजरातला पळवून मोदी यांनी मराठी तरुणांच्या पोटावर लाथ मारली. 370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा आमचे उद्योग गुजरातला का पळवले? आमच्या पोरांना बेरोजगार का ठेवले? या प्रश्नांची उत्तरे मोदी यांनी महाराष्ट्राला द्यावीत, पण मोदी हे भलतेच विषय घेऊन बोलत आहेत. यालाच बनवाबनवी म्हणतात, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने सामनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-