काल रात्रीपर्यंत आमदारांना पैशाचे वाटप:प्रत्येक मतदारसंघात दहा ते पंधरा कोटी रुपये पोहोचले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. मात्र या घोषणेच्या आधीच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. महायुती सरकार आमदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या वतीने काल रात्रीपर्यंत आमदारांना पैशाचे वाटप केले गेले. त्यामुळे आता महाराष्ट्रातील निवडणुका एका टप्प्यात व्हायला हरकत नाही, सगळ्यांना पैसे पोहोचले आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. सत्ताधारी पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या आधी पैशांचे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. प्रत्येक मतदारसंघात दहा ते पंधरा कोटी रुपये पोहोचवण्यात आले असल्याचा आरोप देखील त्यांना केला. ही माहिती मी निवडणूक आयोगाला देत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र निवडणूक आयोगाला पत्र लिहूनही काही फायदा होईल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अमोल कीर्तीकर यांच्या बाबतीमध्ये आपण निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. न्यायालयात देखील गेलो होतो. पुरावे देखील दिले, मात्र, त्याचे काहीही झाले नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. नाशिक मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर गेले असता हेलिकॉप्टर मधून पैशांच्या बॅगा उतरवण्यात आल्या होत्या. त्याचा एक व्हिडिओ देखील आपण निवडणूक आयोगाला दिला होता. मात्र यावर निवडणूक आयोगाच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. राज्यातील निवडणुकांचे सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. मात्र या निवडणुका निपक्ष घ्याव्यात, अशी आमची इच्छा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी त्रास देऊ नये, पैसे आणि यंत्रणांचा त्रास रोखण्यासाठी आयोगाने जागरूक राहावे, एवढी आमची माफक अपेक्षा असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… महाराष्ट्र – झारखंड निवडणुकीची आज घोषणा:EC ची दुपारी 3.30 वा. PC; महाराष्ट्रात एका, तर झारखंडमध्ये 5 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन विधानसभा निवडणुकांप्रमाणे एकाच टप्प्यात मतदान होऊ शकते. तर झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदानाचा कल कायम ठेवला जाऊ शकतो. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-