शरद पवारांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचले:म्हणाले – काहीही बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हीच आमची भूमिका

काहीही बोलणे हे राज ठाकरे यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हीच आमची भूमिका असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे विरुद्ध शरद पवार असे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आता काहीही बोलणार नसल्याचे म्हणत राज ठाकरे यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका मांडली आहे. शरद पवार हे जातीवादी असून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कायम जातीवाद केला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी मी जातिवाद केल्याचे एकही तरी उदाहरण दाखवून द्या, असे आव्हानच राज ठाकरे यांना दिले होते. शरद पवार यांच्या आव्हानाल प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांनी देखील एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये थेट उदाहरण मांडले होते. शरद पवार यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्या डोक्यावरील पुणेरी पगडी काढून ही पगडी नको तर फुलेंची पगडी घाला, असे म्हणत जातीवाद केला होता. असे उदाहरण राज ठाकरे यांनी दिले होते. त्याला आता शरद पवार यांनी देखील उत्तर दिले आहे. याबरोबरच शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी आतापर्यंत काहीही केले नसल्याचे म्हटले होते. त्याला देखील राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांना मी काय केले, याची एक पुस्तिकाच आता पाठवून देतो. वयाच्या मानाने त्यांना आता काही आठवत नसेल, असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला होता. त्यामुळे आता या दोन नेत्यांमधील आरोप – प्रत्यारोप सुरू झाले असल्याचे दिसून आले होते. शरद पवार यांनी बोलणे टाळले राज ठाकरे यांच्या प्रत्युत्तरावर आता शरद पवार यांनी अधिक बोलणे टाळले आहे. राज यांनी दिलेल्या उदाहरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली नाही. या संदर्भात प्रसार माध्यमांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार यांनी बोलणे टाळल्याचे दिसून आले. राज ठाकरे हे कायम काहीही बोलत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची आता आमची भूमिका असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘बाण’ निघून गेला, आता फक्त ‘खान’ उरला:मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता ठाकरे गटाच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ खान राहिले आहेत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पूर्ण बातमी वाचा… उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरेंनी भान ठेवावे:संजय राऊत यांचा निशाणा; गुजराती व्यापाऱ्यांची स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांनी भान ठेवावे, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे हे गुजरामधील दोन व्यापाऱ्यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. त्यांच्यावर राज ठाकरे हे टीका करर असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग निष्पक्ष पणे वागत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. पूर्ण बातमी वाचा… एकनाथ शिंदे-माझ्याही बॅगा तपासल्या गेल्या:अजित पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर; तर रवी राणांवर ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणत केली टीका लोकांना फार नकारात्मक बोललेले आवडत नाही. जनता फार सकारात्मक विचार करत असते. आम्ही देखील एकेकाळे राणांचे समर्थन केले आहे. पण राणा यांनीच स्वतःच्या बोलण्यातूनच पत्नीचा पराभव करून घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. रवी राणा यांनी आता तरी बोलताना काळजी घ्यायला हवी. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात देखील उमेदवार दिला आहे. त्यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. त्यांना समजून सांगायला हवे, अशा शब्दात अजित पवारांनी राणांवर निशाणा साधला. रवी राणांची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झाली असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा….

Share

-