शरद पवारांना गरिबांची नावे आणि श्रीमंतांची कामे लक्षात राहतात:राज ठाकरेंचा पुन्हा एकदा पवारांवर हल्लाबोल, भुजबळांवरही साधला निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक पश्चिम विधानसभेचे उमेदवार दिनकर धर्मा पाटील यांच्या प्रचारार्थ सातपूर येथे राज ठाकरेंची जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांना गरिबांची नावे आणि श्रीमंतांची कामे लक्षात राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे. या भुजबळच्या नदी लागू नका
सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, रस्त्याने जाताना ट्राफिक जाम, फुटपाथ नाही, पण याकडे तुमचे लक्ष जाऊ नये म्हणून या सर्व राजकारण लोकांनी उपाय शोधला आहे. आमच्या महाराष्ट्र मधील अनेक लोकांनी भुरळ पडली आहे, ती म्हणजे जाती जातीत द्वेष सुरू झाला आहे. या भुजबळच्या नदी लागू नका, माळी, मराठा, ब्राह्मण हे सर्व मला प्रिय आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यानंतर जाती जातीत द्वेष निर्माण केला. कारण, यांना फक्त मत पाहिजे, तुमचे डोके फुटले तरी चालतील आता मराठा आणि ओबीसी वाद सुरू झाला. राजकारण्यांनी महापुरुषांची वाटणी जाती जातीत केली. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे केवळ ब्राह्मणांसाठी बोलले होते का, देशाच्या स्वतंत्र्यासाठी बोलेल होतं. महात्मा फुले केवळ माळी समाजासाठी मुलींना शिक्षण देत होते का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये हे घाण राजकारण आणले
पुढे राज ठाकरे म्हणाले, शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये हे घाण राजकारण आणले, तुम्ही याला बळी पडू नका. मराठवाड्यात एका घरात मृत्यू झाला तेव्हा घरात 3 लोक होते, तिरडीला खांदा द्यायला कोणी नव्हते. नंतर त्याचे नातेवाईक आले आणि मग तिरडीला खांदा दिला. कारण, बाहेर वेगळ्या जातींचे लोक होते म्हणून खांदा देत नव्हते. मूलभूत समस्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून जातीयवाद केला जातोय. हे काय राजकारण होतेय ते ओळखा यासाठी माणसे उभे केले जातात. शरद पवारांना गरिबांची नावे आणि उद्योगपतींची कामे लक्षात राहतात
नाशिकविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, नाशिकचे रस्ते केले, नाशिकचा पाणी प्रश्न सोडवला, 50/60 वर्षे पाण्याची गरज भासणार नाही. बोटनिकल गार्डन केले, रतन टाटा यांना आणले, रतन टाटा एवढी मोठी व्यक्ती आहेत कोणी? अशा उद्योगपतीकडे जात नाही, कारण सीएसआर फंडातून काम केले तर पैसे खाता येत नाही. यासर्व उद्योगपतीचे राजकारणी लोकांशी सबंध आहेत, शरद पवारांचे जास्त संबंध आहेत, शरद पवारांना गरिबांची नावे आणि उद्योगपतींची कामे लक्षात राहतात. मी मुख्यमंत्रीच्या खुर्चीसाठी हपापलेला नाही
मी मुख्यमंत्रीच्या खुर्चीसाठी हपापलेला नाही. मला कामाची आवड आहे. आपल्याकडे शोधच लागत नाहीत, कारण मूलभूत समस्याच आपल्याला सोडवता आल्या नाहीत, त्या प्रकारची शांतता पाहिजे नुसता गोंगाट असतो. आपल्याकडे गिनीज बुक रेकॉर्डमध्ये ज्यांचे नखे वाढली, मिशा वाढल्या यांची नाव आहेत, याला काय अक्कल लागते का? मतदान करताना लक्षात ठेवा, यांनी राजकारण खराब केले त्यांना मतदान करू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

Share

-