शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता:भुरट्याताई सुद्धा शब्द काढत नाही; चित्रा वाघ अन् चाकणकरांवर अंधारेंची टीका
भाजपचे आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांवरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला आहे. शिफारशीने मिळालेला आयोग कॉर्पोरेट पार्ट्यापुरता राहिला आहे, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला. जयकुमार गोरे यांच्यावर होत असलेल्या आरोपानंतर सुषमा अंधारे यांनी नाव न घेता संदर्भ देत रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. विषय भाजपच्या किरीटचा असो किंवा जयकुमार गोरेंचा. शिफारशीने मिळालेला आयोग कॉर्पोरेट पार्ट्यापुरता आहे, अशा शब्दांत नाव न घेता सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. तसेच, एरवी चित्रविचित्र आवाज काढत आक्रस्ताळेपणा करणाऱ्या छोट्या भुरट्या ताई सुद्धा गोरेबद्दल चकार शब्द काढत नाही, असे म्हणत चित्रा वाघ यांच्यावरही बोचरी टीका केली. हे सगळे नग म्हणजे ‘एका माळेचे मणी अन् ओवायला नाही कुणी’ असा प्रकार आहे, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी महायुतीमधील या दोन महिला नेत्यांवर संताप व्यक्त केला आहे. आपण गोरे–मुंडे–कोकाटे हे विषय लावून धरायचे अबू आझमींच्या औरंगजेबावरील वक्तव्यावरून मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळावर भाष्य करत आपल्याला डायव्हर्ट व्हायचे नाही, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे सरकार पूर्णतः बॅक फुटवर गेले आहे. लक्षात ठेवा ते अबू आजमी–औरंगजेब म्हणत आपल्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतील. आपण गोरे–मुंडे–कोकाटे हे विषय लावून धरायचे आहेत, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केले. हे ही वाचा… मंत्री जयकुमार गोरेंचे प्रकरण नेमके काय?:महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, पीडितेचा विधिमंडळापुढे उपोषण करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला आहे. या महिलेने या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही, तर 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच हल्लकल्लोळ माजला आहे. पूर्ण बातमी वाचा… जयकुमार गोरेंनी फेटाळले विनयभंगाचे आरोप:म्हणाले – कोर्टाने 2017 मध्येच निर्दोष मुक्त केले, आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीसांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. या आरोपांवर मंत्री जयकुमार गोरे स्पष्टीकरण दिले आहे. विनयभंग प्रकरणातून 2019 मध्येच निर्दोष मुक्त करण्यात आले होते, असे गोरे म्हणाले. तसेच माझ्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात मी सभागृहात हक्कभंग आणणार असून अब्रूनुकसानीचा देखील दावा ठोकणार, असा इशाराही त्यांनी दिला. ते आज विधानभवानात माध्यमांशी बोलत होते. पूर्ण बातमी वाचा…