शिंदेंचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह त्यांच्यासह मोदी शहांकडे गहाण:राऊत यांचा घणाघात; योगी आदित्यनाथ यांच्यावरही जहरी टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासह मोदी तसेच शहांकडे गहाण पडलेले आहे. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यामुळे ज्याची बुद्धी शहांच्या पायाशी गहाण असणाऱ्या व्यक्तीने धनुष्यबाणावर बोलून नसे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी या माध्यमातून एकनाथ शिंदेवर जोरदार निशाणा साधला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. सगळे नेते हे स्वतःला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. सगळ्यांचे पलायन हे ईडीला घाबरून झाले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या देखील तुरुंगात जाऊन आला असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. वायकर हे पळून गेल्यानंतर त्यांची फाईल बंद झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नाही आपला पक्ष सोडायचा आणि भाजपासोबत जायचे, असा दबाव भाजप टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला. कमजोर हृदयाचे लोक पळून गेले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावर देखील भाजपचा दबाव होता, असा आरोप देखील त्यांनी केला. सगळे स्वतःला वाचवण्यासाठी शिंदे सोबत गेले असल्याचे त्यांनी म्हणले आहे. मात्र आम्ही झुकलो नाही तर आम्ही स्वाभिमानाने उभे राहिलो असल्याचा दावा त्यांनी केला. माझ्यावर देखील दबाव होता. मात्र मी त्यांच्या समोर झुकलो नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. योगी आदत्यनाथ यांच्यावर जहरी टीका योगी आदित्यनाथ यांना चार भाऊ आहेत. आणि गेले 40 वर्ष हे चार भाऊ एकत्र येऊ शकले नाहीत. योगी आदित्यनाथ गेल्या अनेक वर्षांत त्यांच्या आईंना भेटले नाहीत. स्वतःच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकले नाही. आणि हेच योगी आदित्यनाथ आम्हाला बटेंगे तो कटेंगे शिकवत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही राष्ट्र आणि समाज एकत्र ठेवण्यासाठी संघर्ष करत आहोत. त्याच वेळी योगी बटेंगे आणि कटेंगेची भाषा करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. सत्ता गेल्यावर त्यांचे देखील बटेंगे आणि कटेंगे होईल, असे राऊत यांनी म्हटले आहे. या संबंधीत खालील बातमी देखील वाचा…. परप्रांतीय मोदी-शहांना राज ठाकरे मदत करताहेत:शिवतीर्थावर 17 नोंव्हेंबरला तणाव निर्माण होण्याची शक्यता; राऊतांनी व्यक्त केली शंका राज्यात सध्या सर्वात मोठे परप्रांतीय हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आहेत. आधी त्यांना बाहेर काढा, अशा शब्दात उद्धव ठकारे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच महाराष्ट्रातून मुंबई काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी राज ठाकरे त्यांना मदत करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी म्हटले आहे. 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा….