रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी:शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; शिफारस करण्याची मागणी

देश आणि जगातील सर्वात प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून आजारी असलेल्या 86 वर्षीय रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील आणि जगातील अनेक व्यक्तींनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रतन टाटा यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे.

देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा जी यांचे निधन केवळ उद्योगासाठीच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी कधीही न भरून येणारी हानी असल्याचे मान्यवरांनी म्हटले आहे. तर केंद्रीय कृषी मंत्री
शिवराज सिंह यांनीही शोक व्यक्त केला असून रतनजी देशाचे ‘रत्न’ होते असे म्हटले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्याच पक्षाचे नेते राहुल कनाल यांनी टाटा यांच्या नावाची भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र देखील लिहिले आहे. पत्राच्या माध्यमातून केली विनंती राहुल कनाल यांनी आपल्या पत्रात लिहिले की, ‘समाजासाठी रतन टाटाजी हे केवळ दूरदर्शी नेतेच नव्हते तर एक दयाळू मानवतावादी व्यक्ती देखील होते. भटक्या प्राण्यांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले परोपकारी प्रयत्न, भारतभरात त्यांच्या पंचतारांकित हॉटेल्सद्वारे आश्रय देणे, समाजातील आवाजहीनांच्या प्रती त्यांची बांधिलकी दर्शवते. या शिवाय, त्यांनी वंचितांसाठी कर्करोग रुग्णालये स्थापन करण्याच्या त्यांच्या समर्पणाने त्यांचा आरोग्य आणि सन्मानाच्या अधिकारावर अढळ विश्वास दर्शवितो. त्यामुळे मी विनंती करतो की, भारत सरकारच्या वतीने प्रदान केल्या जाणाऱ्या सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न पुरस्कारासाठी श्री रतन टाटा जे यांचे नाव सुचवावे.’ राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. रतन टाटा यांचे निधन:राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा; सर्व सरकारी कार्यक्रम रद्द, शासकीय कार्यालयांवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवणार देशातील आघाडीचे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती मुकेश अंबानी रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले होते. पूर्ण बातमी वाचा… आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला:राज ठाकरे यांनी जागवल्या आठवणी; रतन टाटा यांच्या श्नानप्रेमचा किस्साही सांगितला रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी रतन टाटा यांच्या सोबतच्या आठवणी देखील राज ठाकरे यांनी सांगितल्या. इतकेच नाही तर राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्या श्वान प्रेमाचा एक किस्सा देखील सांगितला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे आज मी माझा ज्येष्ठ मित्र गमावला असून त्याचे दुःख आहेच, मात्र एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा कर्तृत्वांतरही निर्लेप राहिलेला उद्योजक गमवल्याचे त्याहून मोठे दुःख असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा… सामाजिक जाणीवेतून यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व:त्यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील, शरद पवारांकडून रतन टाटांना श्रद्धांजली ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सामाजिक जाणीवेतून यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व असा उल्लेख शरद पवार यांनी केला आहे. मदतीचा हात देणे हा त्यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…. औद्योगिक, सामाजिक क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरवले:महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची रतन टाटा यांना आदरपूर्वक श्रद्धांजली देश आणि जगातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर जगभरातील नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे आदरपूर्वक संबंध होते. राज्यातील सर्वच नेत्यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पूर्ण बातमी वाचा….

Share

-