मुंबईत खळबळजनक घटना:राष्ट्रवादी काँग्रेसचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या

मुंबईत विधानसभा निवडणुकीची धामधूम तीव्र झाली आहे. राजकीय घडमोडी घडत असतानाच दुसरीकडे मुंबईतून धक्कादाय घटना समोर आली आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर रात्री अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात कुर्मी यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कुर्मी हे भायखळा तालुकाध्यक्ष असून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. घटनेनंतर लगेचच त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. रुग्णलयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अजित पवार गटाचे भायखळा तालुकाध्यक्ष यांच्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात कुर्मी हे गंभीर जखमी झाले होते. भायखळ्यातील म्हाडा कॉलनीमागे हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. तसेच कुर्मी यांना पोलिस वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरू आहे. या हल्ल्यामागील कारणांचा पोलिस तपास करत आहेत. हल्लेखोर कोण होते? हा हल्ला का करण्यात आला? कुर्मी यांचा कोणाशी वाद किंवा वैर होते का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. या घटनेमुळे राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… भिवंडीतील लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग:अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल; गोदामात रसायनांचा मोठा साठा मुंबई जवळील भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावातील व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण आणि ठाणे अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या रवाना करण्यात आल्या. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. पूर्ण बातमी वाचा… राज्यात NIA आणि ATS ची मोठी कारवाई:छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव मधून तरुण ताब्यात; देश विघातक कृत्यांमध्ये समावेश असल्याचा संशय महाराष्ट्रात पुन्हा एकदा एनआयए आणि एटीएसने मोठी कारवाई केली आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव मधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणांचा समावेश देश विघातक कृत्यांमध्ये असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील काही संघटनांचा देखील या घटनांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा… तिसऱ्या आघाडीमुळे माझी झोप उडाली, आता आमचे कसे होणार?:शरद पवार यांचा संभाजीराजे छत्रपतींना टोला; भयंकर अस्वस्थ असल्याचे म्हणत उडवली खिल्ली आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. मात्र यातच राज्यांमध्ये परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा या तिसऱ्या आघाडीत समावेश आहे. या तिसऱ्या आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल का? असा प्रश्न शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. या तिसऱ्या आघाडीचा नक्कीच परिणाम होईल, माझी तर झोप गेलीये, आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. अशा शब्दात पवारांनी या तिसऱ्या आघाडीला टोला लगावला आहे. पूर्ण बातमी वाचा… आमदार इंद्रनील नाईकांना वाशिमच्या कार्यक्रमातून डावलले:मोदींच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही; जाणीवपूर्वक डावल्याची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाशिम जिल्हा दौऱ्यादरम्यान महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांना वगळण्यात आले आहे. त्यांना डावल्यामुळे इंद्रनील नाईक हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांना जाणीवपूर्वक डावल्याची चर्चा आता या मतदारसंघात सुरू झाली आहे. इतकेच नाही तर भाजपचे माजी आमदार निलय नाईक यांना देखील शासकीय निमंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-