श्रीरामपूरचे कररचना कार्यालय बंद करून अधिकाऱ्यांना डांबून आंदोलन:अभियंत्यांच्या साखळी उपाेषणाची दखल घेतली नाही म्हणून संताप व्यक्त‎

नगररचना विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे श्रीरामपूर कार्यालयासंबंधी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन कार्यवाही न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशनने कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने करचना कार्यालय बंद करून अधिकाऱ्यांना कोंडून घेत आंदोलन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब खेवरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन बडदे, शहर प्रमुख संजय छल्लारे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेन्द्र थोरात, तालुकाप्रमुख लखन भगत, राधाकृष्ण बोरकर, सलीम शेख, सुधीर वायखिंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या उपोषणाला श्रीरामपूर मर्चेन्ट असोसिएशन व बार असोसिएशन, लायन्स क्लब व लाल निशाण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देवून पाठिंबा दिला आहे. यासह श्रीरामपूर बार असोसिएशनचे ॲड. संजय तांबे, ॲड. बाबासाहेब मुठे, ॲड. निघूट, ॲड. विष्णूपंत ताके, ॲड. बी. डी. इंगळे तसेच लायन्स क्लब, लाल निशान पक्षाचे सचिव राजेंद्र बावके, श्रीरामपूर मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील गुप्ता, उपाध्यक्ष स्वरुपचंद खाबिया आदी मान्यवरांनी भेट देऊन या उपोषणास पाठिंबा दिला. या आंदोलनात व्यापारी वकील संघटना लायन्स क्लब लाल निशाण पक्ष यासह अन्य संघटनांनी सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शविला. उपोषणाच्या कालच्या तिसऱ्या दिवशी शिवसेनेच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशनने कार्यालयासमोर साखळी उपोषणस्थळी भेट घेऊन पाठींबा दिला. उपोषण सुरू कोणत्याही अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून काल शिवसेनेच्या वतीने कर रचना कार्यालय बंद करून अधिकाऱ्यांना कोंडून घेतले होते. हे आंदोलन तब्बल तीन तास चालले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. नगर येथील अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर कार्यालयाचे दार उघडून शिवसेनेने आपले आंदोलन मागे घेतले मात्र इंजिनियर्स असोसिएशनचे उपोषण सुरू ठेवण्यात आले. यावेळी नागरिकही उपस्थित होते. कार्यालय प्रमुखाच्या विरोधात घोषणाबाजी इंजिनिअर विशाल साळुंके, प्रमोद कर्डिले, सतीश वराळे, ऋषिकेश बोऱ्हाडे, उमेश तांबडे, सचिन सदाफळ, भरत साळुंके, इंजिनिअर नितीन चौधरी, रुपेश बोऱ्हाडे, जाहीर पिरजादे, नवनाथ खटाने, अध्यक्ष संदीप चव्हाण, सेक्रेटरी संजय देशमुख, खजिनदार विजय शिंपी, राजू पठाण आदीनी कर रचना कार्यालय प्रमुखाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Share

-