सोनांबेत ग्रामस्वच्छता अभियान:तीन टन घनकचऱ्याचे संकलन, आई भवानी वृक्षमित्रांना गावकऱ्यांची साथ

स्वच्छता मोहिमेंतर्गत निफाड न्यायालय व वकिलांच्या कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. न्यायाधीशांनी या मोहिमेत सहभाग घेत स्वच्छतादूत म्हणून काम केले न्यायालय परिसरात संपूर्ण स्वच्छता मोहिमेत निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी, न्यायाधीश बी. डी. पवार, न्यायाधीश ए. टी. काळे निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आरती सराफ, न्यायाधीश जे. व्ही. भेंडे, न्यायाधीश एन. एम. जोशी आदींनी हातात झाडू, फावडे, घमेले घेत स्वच्छता केली. न्यायाधीश, वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी निफाड न्यायालय आवार, निफाड वकील चेंबर्स, परिसरातील कचरा, तण, प्लॅस्टिकचे संकलन करून स्वच्छता केली. निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. प्रतिनिधी | मनेगाव राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधत आई भवानी वृक्षमित्र आणि ग्रामपंचायत सोनांबे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्वच्छता करत अभिवादन करण्यात आले. गावात उत्कृष्टपणे वृक्षलागवड व संवर्धनाचे काम करत गाव हरित करणाऱ्या आई भवानी वृक्षमित्र परिवाराच्या हाकेस साथ देण्यासाठी सकाळी सात वाजेपासूनच गावाजवळील समृद्धी महामार्गाच्या अंडरपास येथून गोवर्धन नागरी सहकारी पतसंस्था, देव नदी ग्रामीण सहकारी पतसंस्था, आई भवानी महिला पतसंस्था, विविध कार्यकारी संस्था, अंगणवाडीसेविका, आशासेविकांसह ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छतेस सुरुवात केली. गाजरगवत, प्लॅस्टिक, पालापाचोळा, कागद गोळा करत ही टीम गावातील राम मंदिर परिसर, मुख्य बाजारपेठ, ग्रामपंचायत परिसर व कालभैरवनाथ मंदिर परिसर स्वच्छ करत होते. याप्रसंगी येथील जनता विद्यालय, जि. प. शाळेचे विद्यार्थी, शिक्षक यांनीही सहभाग नोंदवत ग्रामस्वच्छता केली. देव नदी, भोग नदी परिसर तसेच स्मशानभूमी परिसरही स्वच्छ करण्यात आला. गावातील ग्रामस्वच्छतेचे उत्कृष्ट काम सुरू असताना आबालवृद्धांनाही राहवले नाही. त्यांनीदेखील ग्रामस्वच्छतेत हिरिरीने सहभाग नोंदवला. ग्रामपंचायतीनेही गावातील सार्वजनिक पाणवठा विहीर, शौचालय यांची स्वच्छता करत भूमिगत गटारींचीही स्वच्छता केली. ग्रामस्वच्छतेसाठी आई भवानी वृक्षमित्र यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ग्रामस्वच्छतेत संस्थापक सोपान बोडके, सुमन बोडके, सरपंच जनार्दन पवार, ग्रामपंचायत अधिकारी जालिंदर वाडगे ,माजी जि.प. सदस्य केरू पवार, शरद रत्नाकर, तानाजी पवार, निवृत्ती भागवत, नंदू पवार आदींनी सहभाग घेत विशेष परिश्रम घेतले. रस्त्यावर व इतरत्र कचरा टाकणार नाही यापुढे रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकणार नाही, शौचालयाचा नियमित वापर करू, ग्रामस्वच्छता ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असून गाव स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची शपथ यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घेतली.

Share

-