श्रीलंकन सलामीवीर म्हणाला, लीगमध्ये मुंबई बॉम्बस्फोटांसंबंधित लोकही:खेळाडूंना धोका, लंका क्रिकेट लीगमध्ये भारतीय मालकाच्या अटकेने वातावरण तापले

लंका टी-१० सुपर लीगच्या टीम ‘गॉल मार्व्हल्स’ चे भारतीय मालक प्रेम ठाकूर यांना शुक्रवारी फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक झाली. ठाकूर यांनी लीगमध्ये वेस्ट इंडीजच्या खेळाडूला फिक्सिंगची ऑफर दिली. त्यानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे प्रकरण तापले. पाच सीझन जुन्या लंका प्रीमियर लीग व अलीकडेच सुरू झालेल्या लंका टी-१० सुपर लीगही भ्रष्टाचार, फिक्सिंग व आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कच्या आरोपाखाली आहे. श्रीलंका क्रिकेटचे अधिकारी म्हणाले, लीग टीमचे अनेक मालक परदेशी आहेत. ते जास्तीत जास्त कमाईचा प्रयत्न करतात. फिक्सिंगचे हे प्रकरण श्रीलंका लीगपुरते आहे. याआधी एप्रिल २०२४ मध्ये भारतवंशीय यॉनी पटेल व पी. आकाश यांच्याविरुद्ध लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये फिक्सिंगच्या आरोपात कारवाई झाली होती. श्रीलंका फिक्सिंग प्रकरण खूप गंभीर आहे. श्रीलंकेचे माजी सलामीवीर व एका टीमचे व्यवस्थापक चरिथ सेनानायके यांनी लंका प्रीमियर लीग मालकांची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यांनी काही मालकांवर संशयित कनेक्शन असल्याचाही आरोप केला. यातून खेळाडूंच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. सेनानायके म्हणाले, लंका प्रीमियर लीगमध्ये मुंबई बाॅम्बस्फोटांशी संबंधित (२००८) लोकही जोडलेले आहेत. काही टीमचे मालक भारतात जाऊ शकत नाहीत. हा देशाच्या सुरक्षेसाठी धोका आहे. विशेष म्हणजे २०२३मध्ये माजी क्रीडामंत्री रोशन रणसिंघे म्हणाले, लंका प्रीमियर लीगने बेकायदा चालवली जात आहे. बुकी, सट्टेबाजी एजंटांना संघांसाठी प्रायोजक म्हणून सहभागी करून घेतले. परंतु कोणतीही कारवाई केली नाही. श्रीलंकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, सट्टेबाजी, फिक्सिंगमधील लोक व्यवस्थापन करत आहेत. ठाकूर यांनी वेस्ट इंडीजचे क्रिकेटर आंद्रे फ्लेचरशी संपर्क साधला. नंतर फ्लेचर यांनी हॉटेल सोडले. त्यांनी इतरांशी हातमिळवणी केली असावी. ठाकूर खेळाडूंना हजारो डॉलर्सची लाच देण्याचा प्रस्ताव मांडत होता. मोठा प्रश्न : कमाई नसेल तर लीग का? पैसा पांढरा करण्यासाठी की फिक्सिंग.. क्रीडा पत्रकार मुआद रजिक म्हणाले, बहुतांश लोकांची निगराणी नाही. श्रीलंकेसारख्या देशात क्रिकेटच्या प्रशासकीय नियामक संस्थेकडे साधने नाहीत. अशा ठिकाणी समस्या जास्त आहे.या लीगमधून फारशी कमाई नाही. मग ही लीग का सुरू केली? रजिक म्हणाले, खेळाडू व अधिकारी सावज बनवतात. पैसा व इतर लाभाचा फायदा दाखवून उमेदवारांना फिक्सिंगमध्ये फसवले जाते. श्रीलंकन कर्णधार व निवड समितीचे अध्यक्ष उपुल थरंगा यांचे नावही फिक्सिंगमध्ये आले. लिजेंड्स टुर्नामेंटदरम्यान फिक्सिंगमध्ये अडकल्याचे दिसल्यास ऑक्टोबरमध्ये कोर्टासमोर हजर न झाल्यामुळे थरंगाला अटक झाली आहे.

Share