सुनील टिंगरेनी पाठवली महाविकास आघाडीला नोटीस:बदनामी केली तर कोर्टात खेचेन, सुप्रिया सुळेंनी केली टीका
पुण्यातील वडगाव शेरी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार आमदार सुनील टिंगरे यांनी महाविकास आघाडीला नोटीस पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणात आपल्यावर टीका होत असल्याने ही कॉमन नोटीस पाठवली असल्याची माहिती सुनील टिंगरे यांनी दिली आहे. बदनामी केली तर कोर्टात खेचेन
आमदार सुनील टिंगरे यांनी बजावलेल्या नोटीसवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, पोर्शे कार अपघात प्रकरणात माझी बदनामी कराल तर तुम्हाला कोर्टात खेचेन, असे त्या नोटीसमध्ये लिहिले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्याने आपल्या भाषणात शरद पवारांना 80 वर्षांच्या योद्धा म्हणले होते, ज्यांनी मागच्या निवडणुकीत त्यांच्या एबी फॉर्मवर सही केली होती, ज्यांच्यामुळे ते निवडून आले, त्याच शरद पवारांना तुम्ही पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर नोटीस पाठवली. माझी बदनामी केली तर कोर्टात खेचेन असे त्यात म्हणले होते. पवार साहेबांना वैयक्तिक मी कोणतीही नोटीस बजावली नाही
खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना आमदार सुनील टिंगरे म्हणाले, पवार साहेबांना वैयक्तिक मी कोणतीही नोटीस बजावली नाही आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जी चुकीची माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे अनेक नेते आणि प्रवक्ते यांच्याकडून काही वक्तव्य करण्यात आली. माझी बदनामी झाली तर आता मी या विधानसभेचा उमेदवार म्हणून आता इलेक्शनमध्ये ते पुन्हा एकदा कोणत्याही व्यक्तीकडून चुकीच्या माहितीच्या आधारे कोणती वक्तव्ये होऊ नये अशा पद्धतीची त्यांना नोटीस दिलेली आहे. आजही शरद पवार माझे दैवत
पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीला एक कॉमन नोटीस दिलेली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना ती नोटीस बजावली आहे. त्यात शरद पवार यांचा समावेश आहे. नोटीस पक्षाला दिलेली आहे. आजही शरद पवार माझे दैवत आहेत, ते आमचे कुटुंबप्रमुख आहेत, असे सुनील टिंगरे म्हणाले आहेत.