सुप्रिया सुळेंचे भाजपला आव्हान:म्हणाल्या – छगन भुजबळांनी जे लिहले ते खोटे असेल, तर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यावे

छगन भुजबळांनी जे लिहले यातले काहीही खोटे असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहले आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये एक मोठा दावा करण्यात आला आहे. मी या विषयावर संसदेतही अनेकदा बोलली आहे. माझ्या अनेक भाषणात मी सांगितले की यंत्रणेचा गैरवापर करत पक्ष फोडणे, घर फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी अदृक्ष शक्ती हे संपूर्ण देशात सुरू आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांच्या दाव्याबद्दल बोलताना म्हटले आहे. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, माध्यमांनुसार 95 टक्के ईडी, आयकर आणि केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर विरोधकांवर सुरू आहे, असे मी अनेकदा सांगितले आहे, त्याचा उल्लेख राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पारदर्शक निवडणुकीसाठी प्रयत्न सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एका लोकशाहीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मार्फत पारदर्शक निवडणूक व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. आमच्या मविआच्या आणि मित्रपक्षाचा आम्ही एकत्र प्रचार करत आहोत. ..तर फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यावे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे, तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे घेऊन या. मी देवेंद्र फडणवीसांना अतिशय विनम्रपणे सांगते. ते म्हणतील तिथे चर्चा करायला मी तयार आहे. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जे लिहले यातले काहीही खोटे असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान त्यांनी फडणवीसांना दिले आहे. विराेधी पक्ष, नेत्यांची घरे फाेडाफाेडीचे काम तपास यंत्रणांना हाताशी धरुन अदृश्य शक्ती सातत्याने करत आहे. अदृश्य शक्तींनी माझ्या तीन माेठया बहिणीं रजनी इंदुलकर, नीता पाटील, विजया पाटील यांच्या घरी पाच दिवस आयटीने छापेमारी करुन त्यांच्यावर कुटुंबासमाेर दबाव टाकला. याचप्रकारे संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांचे कुटुंबाना त्रास दिला गेला ते मी पहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर आराेप करणाऱ्यांच्या चाैकशी लावण्याचे काम षडयंत्रातून केले आह. आर.आर.पाटील यांच्या संर्दभातील अंतिम चाैकशी फाईल देखील फडणवीस यांनीच लावली त्यांचीच मुख्यमंत्री म्हणून त्यावर सही आहे. अजित पवार यांना बाेलवून त्यांनी सदर फाईल दाखवली. त्यामुळे फडणवीस यांचेवर खटला भरला पाहिजे त्यांनी राज्याला फसवले आहे. त्यांनी चाैकशीच्या फाईल घरी कशा आणल्या व आणल्या तरी ज्यांचेवर त्यांनी आराेप केले त्यांना दाखवली कशी याचे उत्तर त्यांनी द्यावे अशी टीका खा.सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बाेलताना केली आहे. आव्हाडांनी साधला भाजपवर निशाणा भुजबळ साहेब तुम्ही खरे बोललात ह्या बद्दल आभार, बीजेपी जातीवादी आहे हे बोलण्याची हिम्मत तुम्हीच दाखवू शकता, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुस्तकाने उठले वादळ मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, मी उच्च जातीचा असतो तर केंद्रीय यंत्रणांनी मला असे वागवले नसते, असे छगन भुजबळ एका मुलाखतीत म्हणाल्याचा दावा ​​​​​​ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ माजली आहे. मी ओबीसी असल्याने माझ्यावर कारवाई झाली. मात्र, मी भाजपबरोबर गेल्याने मला ईडीपासून सुटका मिळाली. माझ्यासाठी ईडीपासून मुक्ती म्हणजे पुनर्जन्म आहे. आजही मला झोपेत तुरुंगातले दिवस आठवले तर मला कसंतरी होतं’, असा मोठा गौप्यस्पोटच भुजबळ यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या ‘2024 द एलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया’ या पुस्तकातून केल्याचे समजते. भुजबळांना दावा फेटाळला ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो नाही, तर विकासासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो. राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेले पुस्तक मी स्वत: वाचणार आहे. माझ्या वकीलांनादेखील देणार असून निवडणुकीनंतर यावर काय कारवाई करता येईल ते बघून कारवाई करणार आहे, असा इशाराही भुजबळांनी दिला. मी कुठलीही मुलाखत लोकसत्ताला दिली नाही. महाराष्ट्र सदन प्रकरणी उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना क्लीनचीट मिळाली, तेव्हा मी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पेढे देखील दिले. आम्ही काही जेलमध्ये जाण्याच्या भीतीने सरकारमध्ये गेलो नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

Share