स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरण:पीडित तरुणीने आरडाओरडा का केला नाही? पोलिस तपासात धक्कादायक बाबी समोर
स्वारगेट आगारातील एसटी बस मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याने पीडित तरुणीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची बाब तपासात समोर आली आहे. दत्तात्रय गाडे यांनी पीडित तरुणीचा गळा दाबला होता. त्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली होती. मला जिवंत सोड, अशी याचना तिने दत्तात्रय गाडे याच्याकडे केली. त्याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे यांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिस तपासात सामोरे आहे. याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय गाडे याने मुलगी बस मध्ये चढतात बसचा मुख्य दरवाजा आणि चालक तसेच प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजा देखील बंद केला होता. गाडीमध्ये कोणीच नसण्याचे पाहून तरुणीने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडेने तिला सीटवर ढकलून तिचा गळा दाबला. यावेळी सुरुवातीला तरुणीने आरडाओरड केली. मात्र, बसच्या काचा बंद असल्याने आवाज बाहेर आला नाही. गळा दाबल्या मुळे पीडिता प्रचंड घाबरली होती. तुला काय करायचे ते कर पण मला जिवंत सोड, अशी याचना तिने गाडे कडे केली. तरुणी घाबरलेली पाहून याचा फायदा घेत या नराधमाने तरुणीवर दोन वेळा अत्याचार केले. यापूर्वी देखील त्याने बलात्काराचा प्रयत्न केला असल्याची माहिती दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याचे कुटुंबीय त्याचा बचाव करत असले तरी यापूर्वी देखील त्याने एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मात्र, संबंधित महिलेने घाबरल्यामुळे हे प्रकरण पुढे नेले नाही. त्या महिलेने केवळ दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध चोरीची तक्रार दिली होती. दत्तात्रय गाडे हा दिवसभर गावामध्ये थांबून रात्री पुण्यात शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट आदी बस स्थानकावर महिला सावज शोधत असे, अशी कबुली देखील त्याने यापूर्वीच पोलिसांना दिली आहे. यापूर्वी देखील स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरी प्रकरणी त्याला ताब्यात घेतले होते. मात्र त्यावेळी देखील गाडे याचे कुटुंबीय त्याच्या पाठीशी उभे राहिल्याने तो सुटला होता. कंडक्टर असल्याचे सांगत तरुणीला शिवशाहीमध्ये घेऊन गेला आरोपी दत्तात्रय गाडे याने आपण कंडक्टर असल्याचे सांगत तरुणीला शिवशाहीमध्ये घेऊन गेला होता. अत्याचाराच्या वेळी दत्तात्रय गाडे याने गळा दाबल्याने घाबरलेल्या पीडित तरुणीने त्याने आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी जास्त प्रतिकार केला नाही. दत्तात्रय गाडे याने गळा दाबल्या मुळे तरुणी आधीच घाबरलेली होती. सुरुवातीला तिने आरडाओरडा केला. मात्र बसच्या काचा बंद असल्याने आवाज बाहेर आला नाही. तर ती घाबरलेली असल्याचे पाहून आणि आपल्याकडे याचना करत असल्याचा फायदा दत्तात्रय गाडे याने घेतला आणि तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला.