रविवारी दोन सत्रात शिक्षक पात्रता परीक्षा:मराठवाड्यातील 151 केंद्रावर 87 हजार भावी शिक्षक देणार पेपर

मराठवाड्यातील 151 परिक्षा केंद्रावर रविवारी ता. 10 दोन सत्रात शिक्षक पात्रता परिक्षा घेतली जाणार असून या परिक्षेत 87 हजार 954 उमेदवार सहभागी होणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून परिक्षेची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परिक्षा घेतली जाते. रविवारी ता. 10 दोन सत्रात हि परिक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून 151 परिक्षा केद्राची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये सकाळी साडेदहा ते दुपारी एक यावेळीत पहिला पेपर घेतला आहे. तर त्यानंतर दुपारी अडीच ते सायंकाळी पाच यावेळेत दुसरा पेपर घेतला जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून परिक्षा केंद्रावरील तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या परिक्षेत पहिल्या पेपरसाठी 41375 तर दुसरा पेपरसाठी 46579 उमेदवार परिक्षेला बसणार आहेत. मराठवाड्यात परिक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही परिक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करावी तसेच कुठेही अनुचीत प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याच्या सुचना राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मराठवाड्यात नांदेड जिल्हयात 34 परिक्षा केंद्रावर 8471 उमेदवार पहिला पेपर तर 11544 उमेदवार दुसरा पेपर देतील. छत्रपती संभाजीनगर जिल्हयात 26 केंद्रावर 8414 उमेदवार पहिला पेपर तर 9879 उमेदवार दुसरा पेपर देतील. जालना जिल्हयात 11 केंद्रावर 2930 उमेदवार पहिला तर 3237 उमेदवार दुसरा पेपर, बीड जिल्हयात 16 केंद्रावर 5166 उमेदवार पहिला तर 5456 उमेदवार दुसरा, परभणी जिल्हयात 12 केंद्रावर 3326 उमेदवार पहिला तर 4124 उमेदवार दुसरा, हिंगोली जिल्हयात 8 परिक्षा केंद्रावर 1865 उमेदवार पहिला तर 2166 उमेदवार दुसरा, धाराशिव जिल्हयात 13 केंद्रावर 3029 उमेदवार पहिला तर 3456 उमेदवार दुसरा, लातूर जिल्हयातील 31 परिक्षा केंद्रावर 8156 उमेदवार पहिला तर 9993 उमेदवार दुसरा पेपर देणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

Share

-