मनसेच्या पराभवासाठी ठाकरे-शिंदे यांची छुपी युती होती का?:संदीप देशपांडे यांचा लाडक्या बहिणीचे भाऊ चीटर असल्याचा आरोप

राज्यातील लाडक्या बहिणींचा भाऊ हा चिटर असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेने एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्याचे पत्र व्हायरल झाले होते. यावर संदीप देशपांडे यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. मनसेला हरवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांची छुपी युती होती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना मते मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राज ठाकरे यांच्या नावाचे खोटे पत्र व्हायरल करण्यात आले. लाडक्या बहिणींचे हे भाऊ तर चिटर निघाले असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. यामुळे मिलिंद देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. आगामी 48 तासात मनसे किंगमेकर असल्याचे दिसून येईल, असा दावा देखील त्यांनी केला. राज्यात वाढलेल्या मतांचा फायदा भाजपला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होऊ शकतो, असा दावा देखील संदीप देशपांडे यांनी केला आहे. राज्यातील पोलिस आणि निवडणूक अधिकारी यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा प्रचंड दबाव होता. या संदर्भात आम्ही निवडणूक निर्णय निरीक्षकांना सांगितल्यानंतर त्यांनी आदेश दिला आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. राज्यातील हॉट सीट ठरले वरळी वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा तर मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे राज्यातील हॉट सीट म्हणून या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. बहुमत असो किंवा नसो, अपक्षांना सोबत घेणार:भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; लाडक्या बहिणींच्या मतदानावर विश्वास राज्यात मतांचा टक्का वाढला आहे. राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केले असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. वाढलेल्या मतदानाचा आम्हाला फायदा आम्हाला होईल, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले तरी किंवा नाही मिळाले तरी सत्ता स्थापन करताना अपक्षांना सोबत घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पूर्ण बातमी वाचा…. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार:काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांचा दावा; एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचेही केले स्पष्ट राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे नेते तथा नागपूर उत्तर विधानसभा मतदाररसंघातील उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनतेची पहिली पसंती महाविकास आघाडी असल्याचा दावा देखील त्यांनी केला. विविध संस्थांनी दाखवलेल्या एक्झिट पोलवरही त्यांनी साशंकाता व्यक्त केली आहे. एक्झिट पोलमधील अंदाज हा खरा नसतो, असेही त्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…. राज्यातील राजकारणावर सट्टा बाजारातही वातावरण तापले:मोठ्या प्रमाणात उलाढाल; बहुमत कोणाला? कोणत्या पक्षाचे सरकार येणार? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र यातच विविध संस्थांच्या वतीने एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात सरकार कोणाचे येणार? यावर अंदाज मांडण्यात येत आहे. याच अंदाजात सर्वात महत्त्वाचा असतो तो सट्टा बाजार. राज्यातील सट्टा बाजारात सुद्धा राज्याच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. 23 नोव्हेंबर रोजी कुणाला बहुमत मिळणार आणि कोणत्या पक्षाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार असले तरी यामुळे सट्टा बाजारात चांगलीच उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे. पूर्ण बातमी वाचा…. तारापूर एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग:अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्याला आज भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत अद्याप अधिकची माहिती मिळू शकली नाही. पूर्ण बातमी वाचा….

Share