राज्यातील राजकारणावर सट्टा बाजारातही वातावरण तापले:मोठ्या प्रमाणात उलाढाल; बहुमत कोणाला? कोणत्या पक्षाचे सरकार येणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र यातच विविध संस्थांच्या वतीने एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात सरकार कोणाचे येणार? यावर अंदाज मांडण्यात येत आहे. याच अंदाजात सर्वात महत्त्वाचा असतो तो सट्टा बाजार. राज्यातील सट्टा बाजारात सुद्धा राज्याच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. 23 नोव्हेंबर रोजी कुणाला बहुमत मिळणार आणि कोणत्या पक्षाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार असले तरी यामुळे सट्टा बाजारात चांगलीच उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे. सर्वच मीडिया संस्थांनी आपापले एक्झिट पोल जाहीर केले आहेत. मात्र दुसरीकडे सट्टा बाजाराने देखील एक्झिट पोलच्या माध्यमातून सट्टा लावायला सुरुवात केली आहे. सट्टा बाजारातील आकडेवारीनुसार राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बाजारात पैसा लागल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाला 90 ते 95 जागा मिळण्याची शक्यता सट्टा बाजारात व्यक्त होत आहे. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यात महायुतीला 142 ते 151 जागा मिळेल असा अंदाज आहे. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल असा अंदाज सट्टा बाजारात व्यक्त करण्यात येत आहे. तर यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 36 ते 40 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 12 ते 16 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, हा केवळ एक अंदाज आहे. राज्यातील खरी परिस्थिती ही 23 तारखेलाच स्पष्ट होईल. आणि राजकारणाच्या या सट्टा बाजारात कोण बाजी मारतो? हे त्यानंतरच स्पष्ट होईल. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. भाजपकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीस बट्टा लावण्याचा प्रकार:तर निवडणूक आयोगही झोपाच काढत असावा; उद्धव ठाकरे गटाचा निशाणा ​​​​​​​लोकशाही हाच देशाचा धर्म आहे. त्या धर्मासाठीच स्वातंत्र्याचा संग्राम झाला, पण निवडणुका म्हणजे धर्मयुद्ध असल्याचे सांगत भाजप व संघाचे लोक घराघरात पोहोचले. महाराष्ट्रासारख्या राज्यात हे घडत असताना देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री त्यांच्या सरकारी लवाजम्यासह महाराष्ट्रात तळ ठोकून बसले. संपूर्ण सरकारी यंत्रणेचा गैरवापर त्यात होतो. नव्हे, तो कालच्या निवडणुकीत झालाच आहे. तरीही महाराष्ट्राने सावधपणे मतदान केले. लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला, पण महाराष्ट्रात लोकशाही जिवंत राहील. महाराष्ट्राचा अभिमान विजयी होईल. पैशांच्या महापुरात मराठी स्वाभिमान वाहत गेला नसेल याबाबत आमच्या मनात शंका नसल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. काल झालेल्या मतदान प्रक्रियेवर आणि त्या आधी भाजपच्या प्रचारावर त्यांनी सामनाच्या माध्यमातून टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… तारापूर एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग:अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू​​​​​​​ पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्याला आज भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत अद्याप अधिकची माहिती मिळू शकली नाही. पूर्ण बातमी वाचा….

Share