महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चढाओढ नाही:त्याबद्दल केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल, शहाच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये- चंद्रशेखर बावनकुळे
मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार हे मुख्यमंत्री बनण्याच्या कुठल्याही चढाओढीमध्ये नाही. अमित शहा यांच्या वक्तव्याच्या चुकीचा अर्थ काढू नये. आम्ही विकासाकरिता काम करत आहोत. मुख्यमंत्रिपदासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्व निर्णय घेईल. आम्ही सध्या त्यावर विचार करत नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही विकासासाठी मत मागत आहोत. 14 कोटी जनतेच्या विकासाचा संकल्प घेऊन व सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही काम करतोय. तर मविआमध्ये तशी परिस्थिती नाही, त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे 14 दावेदार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, छगन भुजबळ आणि मी सोबत होतो. त्यांनी मला सांगितले की, मी कुणाला मुलाखत दिली नाही, असे काही बोललो नाही, माझ्या नावाचा गैरवापर करण योग्य नाही, भुजबळ हे कायदेशीर कारवाई करतील असे दिसत आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रात विकास व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी राज्यात डबल इंजिन सरकार याठी ते प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे आहेत, म्हणून भाजपचा विजय तो त्यांचा विजय विजय या अर्थाने शहा यांनी ते वक्तव्य केले. याचा वेगळा अर्थ घेऊ नये असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. पटोलेंची परिस्थिती शोले चित्रपटातील असरानींसारखी चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत असलेले सगळे वेगवेगळ्या पक्षात गेले आहेत. त्यांच्यासोबत कोणी राहिले नाही. त्यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. सध्या नाना पटोले हे शोले चित्रपटातील असरानीच्या भूमिकेत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीला राज्यात कुठेही समर्थन नाही. त्यांच्याजवळ जाहीर सभामधून काहीही सांगण्यासारखे नाही, त्यामुळे केवळ भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर टीका करणे हा एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे.