मुलभूत सुविधा प्रदान करा; नागरिकांचे आंदोलन:नाल्याचे खोदकाम करून साफसफाई, पथदिवे सुरू करण्याचीही मागणी‎

महानगरपालिका हद्दीतील गौतम नगरातील(जुना आरटीओ ऑफिस) नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. महानगरात अनेक ठिकाणी रस्ते, अस्वच्छता, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. या मुलभूत सुविधांसाठी अनेकदा नागरिक महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयावरही धडक देतात. प्रशासनाला निवेदनही देतात. मात्र त्यानंतरही समस्या सुटत नाहीत. दरम्यान आता गौतम नगरातील मूलभूत सुविधांचा मुद्दा पुढे आहे आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. घरकुल नाही. रस्ते नाही नाल्याची साफसफाई होत नसून, लाईटसुद्धा बंद आहेत. बंद पडलेली बोअरिंग सुरू करण्यात यावी व नळ कनेक्शन मधून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा मागण्या नागरिक कित्येक वर्षापासून करत आहेत. नालीचे सफाई करण्यात येत नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत आहे. अनेक डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शासनाचे प्रत्येकाचे हक्काचे घर या योजने अंतर्गत सर्व लाभार्थींना घरकुल देण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली. मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनने पुढाकार घेतला. आंदोलनात परवेज खान, आारीफ शाह, पूजा जाधव, गंगा गवई, रोशन पंचाग, हमीद शहा, अश्विनी नरवाडे आदींसह महिला व पुरुष होते. गौतम नगर येथे पिण्याच्या पाण्यासाठी बंद पडलेली बोअरिंग सुरू करण्यात यावी. नित नळ कनेक्शनमधून पाणी पुरवठा करण्यात यावा. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यात यावे. नाल्याचे खोदकाम करून साफसफाई करण्यात यावी व स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी. बंद पडलेले स्ट्रीट लाईट सुरू करण्यात यावे. नवीन रस्ते बांधण्यात यावे. घरकुल योजना राबवण्यात यावी. नाल्याचे खोदकाम करून साफसफाई, पथदिवे सुरू करण्याचीही मागणी

Share

-