महिलांच्या हातात देशाचे अर्थकारण असणे प्रगतीचे लक्षण:पैसे बुडून देशातून पळून गेलेले सर्व पुरुष- पंकजा मुंडे

महिला कधीच कुणाचे उधार ठेवत नाही, पैसे बुडून देशातून पळून गेलेले सर्व पुरुष आहे. महिलांचे हातात देशाचे अर्थकारण असेल त्यांना प्राेत्साहन दिले गेले तर त्यांच्याकडे आलेले पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेतच असणार आहे आणि हे प्रगतीचे लक्षण आहे. देश प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करत असून पंतप्रधान यांची जगात पत वाढलेली आहे. राज्यात पुन्हा महायुती सरकार आले नाही तर नुकसान जनतेचे हाेणार आहे असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. शिवाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सिध्दार्थ शिराेळे यांच्या प्रचारार्थ राेकडाेबा मंदिर सभागृह येथे आयाेजित महिला मेळाव्यात त्या बाेलत हाेत्या. रस्ते नसल्याने थांबावे लागत होते पंकजा मुंडे म्हणाल्या की, पूर्वी बीडवरुन मुंबईला जाताना पुण्यात थांबावे लागत हाेते कारण त्याकाळी अटलजी किंवा माेदी यांच्या काळातील विकसित रस्ते नव्हते. 16 तास प्रवास करताा घाटात अडकल्यास अडकून पडावे लागत असे. त्यामुळे माझे बाबा व मी पुण्यात अनिल शिराेळे यांच्याकडे येत असू. त्यांना लाेकसभा निवडणुक लढवयाची नव्हती परंतु मुंडे साहेबांनी त्यांना हट्टाने निवडणुकीत उभे केले तसेच शहराध्यक्ष पदावर देखील त्यांनी काम केले. त्यांचा वारसा आमदार सिध्दार्थ शिराेळे चालवत असून दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुक लढवत आहे. त्यांचा सन्मानजक विजय हाेईल मला विश्वास आहे. माेठया माणसाच्या घरी माझा जन्म झाल्याने माेठे संघर्ष माझ्या वाटयाला आले. स्त्रीमध्ये सेवा वृत्ती पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रत्येक स्त्रीला ती वकील असाे, डाॅक्टर असाे, अभियंता असाे किंवा ती कामगार असाे तिला संघर्ष नेहमी असताे. पती व पत्नी दाेघे काम करत असले तरी पतीकधी घरात स्वयंपाक करताना दिसत नाही. मी पुरुषांची तक्रारी करत नाही. पण स्त्रीमध्ये सेवा वृत्ती आहे. स्त्री लढाई बिकट झाली कलयुगात कारण तिच्या पदराला पैसे मिळत नाही. पैसे जपून ती घरासाठी खर्च करते परंतु स्वत:च्यासाठी ती खर्च करत नाही. महिलांना पैसे बचत करुन पैठणी, गंठन घ्यायचे नसते तर एखाद्या वेळेला वापरण्यासाठी ते पैसे जवळ बाळगतात. शून्य टक्के व्याज दराने बचत गटांना कर्ज देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला.

Share

-